नवी दिल्ली : विमान प्रवास बंदी असतानाही तेलगू देसम पार्टीचे खासदार जे सी दिवाकर रेड्डी विमानाने युरोपला रवाना झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला एक न्याय आणि टीडीपीला दुसरा न्याय का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
याआधी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमानात कर्मचाऱ्याशी वाद घातल्याने त्यांच्यावर विमान प्रवासाची बंदी घातली होती. त्यानंतर ती बंदी उठवण्यात आली. मात्र बंदीच्या काळात त्यांना विमानाने प्रवास करता आला नाही.
शिवाय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती यांनी रवींद्र गायकवाड यांना उपदेशाचे डोस पाजले होते.
देशी कंपन्यांनी बंदी घातल्यानंतर जे सी दिवाकर रेड्डी यांनी नामी शक्कल लढवली आहे. खासदार रेड्डी आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांच्या विमानातून युरोपला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रवाना झाले आहेत.
संबंधित बातमी : टीडीपीच्या खासदाराचा विशाखापट्टणम विमानतळावर गोंधळ
त्यामुळे टीडीपीचे खासदार असल्याने आणि हवाई वाहतूक मंत्रीही टीडीपीचेच असल्याने दिवाकर रेड्डी यांना सॉफ्टकॉर्नर मिळाल्याचा आरोप होत आहे.
काय आहे प्रकरण?
दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर गोंधळ घातला. रेड्डींना सकाळी 8.10 वाजता विशाखापट्टणम विमानतळावरुन हैदराबादला जायचं होतं. मात्र, ते विमान उडण्याच्या 28 मिनिटं आधी विमानतळावर पोहोचले. खरंतर त्यांनी 45 मिनिटं आधी पोहोचणं अपेक्षित होतं. त्यामुळे चेक इन काऊंटर बंद झालं. यानंतर रेड्डी संतापले आणि काही कर्मचाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली.
या प्रकारानंतर इंडिगो एअरलाईन्ससह एअर इंडिया, स्पाईस जेट, जेट एअरवेज, विस्तारा, गो एअर, एअर एशियाने त्यांच्यावर बंदी घातली.