मुंबई : तात्काळ पासपोर्ट यापुढे अक्षरशः तात्काळ मिळणार आहे. अवघ्या तीन दिवसात तात्काळ पासपोर्ट हाती देण्याची सुविधा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
तात्काळ पासपोर्टसाठी क्लास वन श्रेणीतील अधिकाऱ्याकडून सत्यप्रत प्रमाणपत्र आणण्याची अट परराष्ट्र मंत्रालयाने शिथील केली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी तुम्हाला तात्काळ पासपोर्ट मिळू शकेल. तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी साधारण 3 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
अर्थात, आधार कार्डासोबत नियमाप्रमाणे ठरलेल्या विविध 12 प्रमाणपत्रांपैकी कोणत्याही दोन प्रमाणपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे. या सर्व कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतर पासपोर्ट तयार होऊन पोलिस रिपोर्ट मागवण्यात येईल.
दुसरीकडे, अकुशल कामगारांना केशरी पासपोर्ट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टचं शेवटचं पान कोरं ठेवण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.