नवी दिल्ली : 20 जुलै 1969 आजच्या दिवशीच नील आर्मस्ट्राँग या आंतराळवीराने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं आणि संपूर्ण जग रोमांचित झालं होतं. त्यावेळी खुद्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रात्रभर जागून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरेपर्यंत जागरण केलं होतं.


20 जुलै 1969 साली अमेरिकेचा आंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने अपोलो-11 च्या माध्यमातून एल्विन ऑल्ड्रिनच्या साथीने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. नीलकडून चंद्रावर ठेवलं गेलेलं ते पहिलं मानवी पाऊल होतं आज या घटनेला बरोब्बर 52 वर्ष पूर्ण झाली. या मोहिमेच्या यशानंतर आर्मस्ट्राँगने अ‍ॅल्ड्रिनबरोबर जगातील अनेक देशांचा दौरा केला. ते दोघे भारतातही आले होते आणि त्यांनी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती. त्यांची ही भेट काहीशी ऐतिहासिकच ठरली आणि इंदिरा गांधींनी त्यांचं भरभरुन कौतुकही केलं होतं.


'त्या' भेटीत काय घडलं?
माजी विदेशमंत्री नटवर सिंह यांनी आपल्या पुस्तकात हा सगळा वृत्तांत लिहून ठेवला आहे. ज्यावेळी ही भेट घडली त्यावेळी नटवर हे त्या ठिकाणी उपस्थित होते. इंदिरा गांधींनी इशारा केल्यानंतर नटवर सिंह यांनी आर्मस्ट्राँगला सांगितलं की, तुमचे चंद्रावर उतरण्याचे क्षण चुकू नये म्हणून पंतप्रधान मॅडम सकाळी 4.30 वाजेपर्यंत जाग्या होत्या.


'आर्मस्ट्राँगचे गांधींना विनम्र उत्तर'
ज्यावेळी नटवर सिंह यांनी इंदिराजींच्या जागण्याबद्दलचं वृत्त कथन केलं त्यावर नील आर्मस्ट्राँगने इंदिराजींना सगळ्यांच्या देखत अतिशय विनम्रतेने उत्तर दिलं. ते उत्तर होतं,'' पंतप्रधान मॅडम आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. पुढच्या वेळी जेव्हा चंद्रावर उतरेन त्यावेळी खात्री करुन घेईन की आपल्याला इतकं जागं राहण्याची गरज पडणार नाही याची.''


इंदिरा गांधींकडून आर्मस्ट्राँगची प्रशंसा
आर्मस्ट्राँगची विनम्रता पाहून इंदिरा गांधी चकित झाल्या, आपली कुठलीही चूक नसतानाही एवढ्या मोठ्या व्यक्तीने दिलगीरी व्यक्त केल्याने त्यांचा त्याच्या प्रति आदर वाढला. आणि त्यांनी स्वत:हून पुढे होत त्याच्या वागण्याची प्रशंसा केली ज्यांचं जगभरात कौतुक झालं होतं. अशा प्रकारे नील आर्मस्ट्राँग आणि इंदिरा गांधी यांची ही अशी भेट ऐतिहासिक ठरली होती आणि माझ्यासाठी सुद्धा ही भेट खास लक्षात राहील असं आर्मस्ट्राँग यांनीही सांगितलं.


प्रत्यक्षात दुसऱ्यांदा चंद्राच्या मिशनवर आर्मस्ट्राँग पुन्हा काही गेला नाही. म्हणजे असंही बोललं जातं की, पहिल्यांदाही आर्मस्ट्राँग जेव्हा चंद्रावर जाणार होता तेव्हाही खूप घाबरले होता. आपण जिवंत पुन्हा येऊ की नाही याची त्याला खात्री नव्हतीती.  पण, जेव्हा तो ही मोहीम फत्ते करुन आला तेव्हा मात्र संपूर्ण जगासाठी तो हिरो ठरले.


आर्मस्ट्राँगची थोडक्यात ओळख
नील 200 पेक्षा जास्त प्रकारची विमाने उडवायचे. ड्रायव्हिंग परवान्यापूर्वी त्याला वयाच्या 16 व्या वर्षी पायलटचा परवाना मिळाला होता. 1966 मध्ये जेमिनी-8 वर कमांड पायलटची भूमिका घेत नील नासाचा पहिला नागरी अंतराळवीर ठरला होता. आर्मस्ट्राँगने 1971 मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासा सोडली. मग त्याने विद्यार्थ्यांना अंतराळ अभियांत्रिकीविषयी शिकवण्यास सुरुवात केली. तो हृदयरोगाशी झुंज देत होता. त्याचे ऑपरेशन झाले. मात्र, नंतर त्याची प्रकृती अधिकच खालावली. 25 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले.