विशाखापट्टणम : तेलुगू देसम पार्टीचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर गोंधळ घातला. या सर्व प्रकारानंतर एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाईस जेट या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी रेड्डी यांच्यावर बंदी घातली आहे. रेड्डी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधून टीडीपीचे खासदार आहेत.

तेलुगू देसम पार्टीचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांना विशाखापट्टणम विमानतळावरुन हैदराबादला जायचं होतं. मात्र, ते विमानतळावर उशिरा पोहोचले. त्यामुळे इंडिगो एअरलाईनने त्यांना विमानात जाण्यापासून रोखले.

https://twitter.com/ANI_news/status/875393269273829376?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Findia-news%2Findigo-other-airlines-bar-tdp-mp-diwakar-reddy-after-he-creates-ruckus-at-vizag-airport-636596

रेड्डी यांना सकाळी 8.10 वाजता विशाखापट्टणम विमानतळावरुन हैदराबादला जायचं होतं. मात्र, ते विमान उडण्याच्या 28 मिनिटं आधी विमानतळावर पोहोचले. खरंतर त्यांनी 45 मिनिटं आधी पोहोचणं अपेक्षित होतं. त्यामुळे चेक इन काऊंटर बंद झालं. मात्र, रेड्डी यांनी उशिरा पोहोचल्याचे आरोप फेटाळले आहेत.

या सर्व प्रकारानंतर इंडिगो एअरलाईसोबतच एअर इंडिया आणि स्पाईस जेटनेही रेड्डी यांच्यावर बंदी आणली आहे. रेड्डी यांनी गेल्यावर्षीही असाच गोंधळ घातल्याचा आरोप आहे.

कोणत्या कंपन्यांनी खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांच्यावर बंदी घातली आहे?

  • इंडिगो एअरलाईन्स

  • एअर इंडिया

  • स्पाईस जेट

  • जेट एअरवेज

  • विस्तारा

  • गो एअर

  • एअर एशिया


दरम्यान, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती हेही टीडीपीचेच नेते आहेत. त्यामुळे गजपती आता काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.