IndiGo Flight Grounded: दिल्लीवरुन बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. बंगळुरुला जाणाऱ्या 6E-2131 या विमानाच्या इंजिनला आग लागल्याचं लक्षात येताच दिल्लीमध्ये लँडिंग करण्यात आलं. प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विमानाला आग लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.
रिपोर्ट्सनुसार, दिल्लीवरुन बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो 6E-2131 ने टेक-ऑफ रद्द केलं आहे. दिल्लीमधील इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी प्रियंका कुमार यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये विमानाच्या इंजिनला आग लागल्याचं दिसत आहे. प्रसंगावधान राखत विमानाच लँडिंग केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
इंडिगोकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. इंडिगोनं म्हटलेय की, दिल्लीवरुन फ्लाईट क्रमांक 6E-2131 बंगळुरुसाठी रवाना होणार होती. विमानात तांत्रिक समस्या निदर्शनास आली. त्यामुळे विमानाचं लँडिंग करण्यात आलं. फ्लाईटमधून प्रवास करणारे प्रवासी, वैमानिक आणि क्रू मेंबर्स सर्व सुरक्षित आहेत. प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची सोय करण्यात येत आहे.