मुंबई : देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना या इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट्समुळे होत असून पॉर्न साईट्सवर बंदीची मागणी जोर धरु लागली आहे. पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे.

देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना या इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट्समुळे होत असून पॉर्न साईट्सवर बंदीची मागणी जोर धरु लागली आहे. टेलिकॉम उद्योगातील तज्ज्ञांच्या मते भारतात एकूण इंटरनेट वापरापैकी 70 टक्के वापर पोर्नोग्राफी बघण्यासाठी होतो. काही पॉर्न संकेतस्थळांनीही याला दुजोरा दिला आहे. पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या पोर्नोग्राफिमुळे तरुण विकृत मानसिकतेचे शिकार होत असून त्यातून बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचं सांगितलं जातं आहे.

रेस्क्यु अॅण्ड रिसर्च संस्थेनं केलेल्य़ा एका अहवालात एक धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. मुंबईतल्या 30 महाविद्यालयात या संस्थेनं सर्वेक्षण केलं आहे. त्यांच्या अहवालातल्या आकडेवारीनुसार मुंबईतल्या पालकांच्या चिंतेत मात्र वाढ होणार आहे.

काय सांगत आहे आकडेवारी ?

भारतात 2013-2017 मध्ये पॉर्न ट्रॅफिकमध्ये 121 टक्के वाढ

जगातील कुठल्याही देशापेक्षा ही सर्वाधिक आकडेवारी

2013 मध्ये 39 टक्के पॉर्नोग्राफिक सामग्री मोबाईल फोनद्वारे पसरत होती.

2017 मध्ये 86 टक्के इतकी वाढली.

टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त इंटरनेट डेटा देण्यास सुरुवात केल्यानंतर पॉर्न पाहण्याचा आकडा 75 टक्क्यांनी वाढला.

पॉर्न पाहण्याचा वेळही सरासरी 60 टक्क्यांनी वाढला.

आठवड्यातले सरासरी 28 तास लोक स्मार्ट फोनवर असतात.

हा आकडा टीव्ही पाहण्यापेक्षाही जास्त आहे.

स्मार्ट फोनवर एकूण खर्च होणार्‍या वेळेपैकी 45 टक्के वेळ मनोरंजनासाठी असतो.