श्रीनगर : देशातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं. जम्मू श्रीनगर महामार्गावर बांधण्यात आलेल्या या बोगद्याची लांबी 9.2 किमी इतकी आहे. या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर कमी झालं आहे. चेनानी नशरी लिंक असं या बोगद्याचं नाव आहे.
फक्त जम्मू आणि काश्मीरमधीलच नाही तर देशातील सर्वात लांब बोगद्यामुळे श्रीनगर ते जम्मू हे अंतर 30 किमीनं कमी होणार आहे. या बोगद्यात प्रत्येकी 75 मीटरच्या अंतरावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तर जवळपास 124 सीसीटीव्हींच्या मदतीनं बोगद्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे.
बोगद्यातील सीसीटीव्हींवर नजर ठेवण्यासाठी एका कंट्रोलरुमची निर्मिती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील वाहतूकीला या बोगद्यामुळे फायदा होणार आहे.
चेनानी नशरी लिंक बोगद्याची वैशिष्ट्य
जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर 30 किमीनं घटणार
6 वर्षांनंतर बोगद्याचं काम पूर्ण
बोगद्यात फायर कंट्रोल, व्हेंटिलेशन, सिग्नल आणि अत्याधुनिक संपर्क यंत्रणा
हिमालय पर्वतरांगांतील बोगद्यासाठी 3 हजार 720 कोटींचा खर्च
बोगद्यात 150 मीटरच्या अंतरावर एसओएस बॉक्स
बोगद्यातील हालचालींवर 124 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
संकटाच्यावेळी संपर्क साधण्यासाठी हॉटलाईनची सुविधा