नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या वक्तव्याने हळूहळू राजकीय वातावरण तापायला लागलं आहे, मात्र दुसरीकडे वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांनी मिठाई वाटून भारतीय सैनिकांनी पाकच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 
बीएसएफच्या जवानांकडून पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यातून भारतीय सैन्यांनी आपल्यातील धीरोदात्तपणाचं दर्शनच घडवलं.

 
वाघा बॉर्डरवर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी सैनिकांना मिठाई वाटली आणि शुभेच्छाही दिल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत.

 
भारताकडून मात्र मिठाई देऊन पाकला शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे शुभेच्छांची परतफेड पाकिस्तानही चांगल्याच पद्धतीने करेल आणि सीमेवर शांतता नांदेल ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.