मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एका व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय सेनेला मानवंदना दिली आहे. 'लव्ह युअर कंट्री' शीर्षकाखालील हा व्हिडीओ शुक्रवारी युट्यूबवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये बलात्कार, स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी यांसारख्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

 

हा व्हिडीओ तीन मिनिटांचा आहे. या व्हिडीओतील गाणं सिद्धार्थ शर्मा, पियूष वासनिक आणि यश चौहान यांनी गायलं असून कंगना 'डू यू वोट' असा प्रश्न विचारताना दिसत आहे.

 

यापूर्वी कंगना दुसऱ्या पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या एका व्हिडीओमध्ये दिसली होती. या व्हिडीओमध्ये तिने लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता.

 

पाहा व्हिडीओ :