मुंबई: रेल्वे (Indian Railway) प्रवासात असतानाच प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या, त्याच वेळी आरपीएफ (RPF) महिला कॉंस्टेबल देवदूतासारखी धावून आली आणि तिने या महिलेला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. या महिलेची प्रसूती झाली असून ती आणि तिचे बाळ सुरक्षित आहे. या महिलेच्या मदतीला धावून आलेल्या महिला कॉंस्टेबलचे नाव ममता डांगी (Mamta Dangi) असं असून तिचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. 


आज सकाळी 8.20 मिनिटांनी दिवा स्टेशन मास्तरकडून एक मेसेज आला आणि त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या ममता डांगी या महिला कॉंस्टेबलने जीआरपी स्टाफच्या मदतीने प्रसूतीच्या वेदाना सुरू झालेल्या या महिला प्रवासीची मदत केली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. ममता डांगी यांच्या या कामाचं कौतुक रेल्वे प्रशासनाने केलं आहे. 


मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (𝐂𝐡𝐢𝐞𝐟 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐑𝐞𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞𝐫 (𝐂𝐏𝐑𝐎), 𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐚𝐥 𝐑𝐚𝐢𝐥𝐰𝐚𝐲, 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢)  शिवाजी सुतार यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी ममता डांगी, आरपीएफ आणि जीआरएफ स्टाफच्या कामाचे कौतुक केलं आहे. 


 






संबंधित बातम्या: