Hardoi : उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका महिलेने चार पाय आणि चार हात असलेल्या मुलाला जन्म दिला आहे. सुरुवातीला बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले, मात्र काही वेळाने बाळाला लखनौ येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. दुसरीकडे, बाळाच्या प्रकृतीची माहिती मिळताच रुग्णालयात गर्दी होऊ लागली.


वास्तविक, ही घटना हरदोई जिल्ह्यातील शहाबाद सीएचसीची आहे. आज तकच्या ऑनलाईन रिपोर्टनुसार, शनिवारी रात्री उशिरा एका महिलेने चार हात आणि चार पाय असलेल्या मुलाला जन्म दिला. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जन्मलेल्या या मुलाचे चार हात आणि चार पाय पाहून लोक आश्चर्यचकित झाले. सुरुवातीला डॉक्टरांच्या टीमलाही आश्चर्य वाटले, पण नंतर त्यांनी यामागचे कारणही सांगितले.


रिपोर्टनुसार, हे मूल करीना आणि संजयचे असून ते शाहाबादमधील मांगलीपूरचे रहिवासी आहेत. कुटुंबीयांनी मुलाला जन्म दिल्यानंतर पाहिल्यावर त्यांचा विश्वास बसेना आणि ते अस्वस्थ झाले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, ही जुळी मुले जन्माला आल्याची घटना आहे, परंतु दुसऱ्या मुलाच्या शरीराचा विकास योग्य प्रकारे होऊ शकला नाही, ज्यामुळे एका मुलाला अतिरिक्त हात आणि पाय होते.


दुसरीकडे, लोकांना मुलाची माहिती मिळताच रुग्णालयात गर्दी होऊ लागली. या मुलाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक म्हणाले की देव आला आहे असे वाटते. सध्या डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून बाळाला शाहबाद येथून हरदोई आणि नंतर लखनौला पाठवले.


इतर महत्वाच्या बातम्या