नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281 वर जाऊन पोहोचला आहे. कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक बळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व खासदाराच्या पगारात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रपती, उपराष्ट्रपाती आणि पंतप्रधान यांच्या पगारात देखील 30 टक्के कपात करण्यात आली आहे.


आता आपण जाणून घेऊया की देशाच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो आणि 30 टक्के कपात केल्यावर त्यांना पुढील एका वर्षासाठी किती पगार मिळणार आहे.

किती आहे राष्ट्रपतींचा पगार?

संसद अधिनियम 1954 नुसार पगार, भत्ता आणि पेंशनवर 2018 मध्ये संशोधन करण्यात आलं. या संशोधनात राष्ट्रपतींचा पगार दर महिना पाच लाख करण्यात आला. या आधी राष्ट्रपतींचा पगार 1.5 लाख होता.

30 टक्के कापातीनंतर राष्ट्ररतींना मिळणारा पगार

कोरोना व्हायरसचं वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रपतींच्या पागारात 30 टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींना पाच लाख रुपये पगार आहे. त्यात 30 टक्के घट केल्यास उरतात 3.5 लाख रुपये. म्हणजेच पुढील एक वर्ष राष्ट्रपतींना तीन लाख पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी स्वत:हून आपल्या पगारात 30 टक्के कपातीची शिफारस करण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच मोदी सरकारने खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढच्या एक वर्षासाठी ही पगार कपात राहणार आहे. तर, दोन वर्षे खासदार निधीचे पैसेही मिळणार नाहीत.

VIDEO | #Corona Help | राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालांची स्वेच्छेने 30% पगार कपात, खासदारांच्या पगारातही कपात



देशात कोरोनाचा आकडा वाढला

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 3851 सक्रिय रूग्ण असून त्यापैकी 1445 रूग्ण हे तब्लिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रूग्णांपैकी 76 टक्के पुरूष आणि 24 टक्के महिला आहेत.

देशात COVID-19 मुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या रूग्णांचे आकडे सर्वांसमोर जाहीर केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 63 टक्के मृत्यू 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झाले आहेत. तर 30 टक्के मृत्यू हे 40 ते 60 दरम्यान वय असणाऱ्या लोकांचे झाले आहेत. तर 7 टक्के कोरोनाग्रस्त हे 40 पेक्षा कमी वयाचे आहेत.

VIDEO | World Corona Update | जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त; अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाचा कहर