श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील त्रास भागात भारतीय जवांनानी रविवारी एका मोबाईल टॉवर फडकवलेला पाकिस्तानच झेंडा उतरवण्यासाठी जीवाची बाजी लावली. राष्ट्रीय रायफल्सच्या सचिन कुमार हा जवान दहशतवाद्यांच्या गोळ्या आणि हल्ल्याची पर्वा न करता मोबाईल टॉवर चढला. त्याने पाकिस्तानचा झेंडा उतरवून तिथे तिरंगा फडकावला.


 

महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी चकमकीत भारतीय जवानांकडून खात्मा झालेल्या बुरहान वाणीच्या गावात ही घटना आहे.

 

काही फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनाला सुमारे 50 मीटर उंचीच्या मोबाईल टॉवरवर पाकिस्तानचा झेंडा फडकावला होता. ही बाब भारतीय जवानांच्या तुकडीच्या निदर्शनास आली. यानंतर सचिन कुमार या जवानाने त्याच्या कमांडिग ऑफिसरकडून परवानगी मागितली.

 

जीवाची पर्वा न करता हा जवान टॉवरवर चढला आणि पाकिस्तानी झेंडा हटवत भारतीय तिरंगा डौलाने फडकावला. इतकचं नाही तर तिरंगा फडकावल्यानंतर इतक्या उंचीवरही या जवानाने तिरंग्याला सलामी दिली.

 

पाहा व्हिडीओ