दहशतवाद्यांशी लढताना कंमांडंट प्रमोद कुमार शहीद
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 03:04 AM (IST)
श्रीनगर : देशभर 70वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना श्रीनगरच्या नौहट्टा चौकात सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडंट प्रमोद कुमार आसनसोल शहीद झाले. तर 6 जवान जखमी झाले आहेत. नौहट्टा परिसरात सकाळी आठच्या सुमारास सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला झाला. या परिसरात जवान तैनात करत असताना दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून 2 एके-47, 8 मॅग्झिन आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला.