नवी दिल्ली : भारताच्या वायू सेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून 200 ते 300 अतिरेकी ठार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याची माहीती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताकडून किंवा लष्कराकडून या बातमीला अद्याप दुजोरा मिळाला नाही. परंतु एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. आज भारताने त्याचा बदला घेतला आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने हिंदीतले प्रसिद्ध कवी रामधारी सिंह "दिनकर" यांच्या कवितेच्या ओळी ट्वीट केल्या आहेत. 'क्षमाशील हो रिपु-समक्ष तुम हुए विनीत जितना ही, दुष्ट कौरवों ने तुमको कायर समझा उतना ही। सच पूछो, तो शर में ही बसती है दीप्ति विनय की, सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।' कवितेचा अर्थ  जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं. परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते. तसं तुम्ही आम्हाला समजू नका. असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. खरतर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे. संपूर्ण कविता 
क्षमा, दया, तप, त्याग, मनोबल सबका लिया सहारा पर नर व्याघ्र सुयोधन तुमसे कहो, कहाँ, कब हारा? क्षमाशील हो रिपु-समक्ष तुम हुये विनत जितना ही दुष्ट कौरवों ने तुमको कायर समझा उतना ही। अत्याचार सहन करने का कुफल यही होता है पौरुष का आतंक मनुज कोमल होकर खोता है। क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो उसको क्या जो दंतहीन विषरहित, विनीत, सरल हो। तीन दिवस तक पंथ मांगते रघुपति सिन्धु किनारे, बैठे पढ़ते रहे छन्द अनुनय के प्यारे-प्यारे। उत्तर में जब एक नाद भी उठा नहीं सागर से उठी अधीर धधक पौरुष की आग राम के शर से। सिन्धु देह धर त्राहि-त्राहि करता आ गिरा शरण में चरण पूज दासता ग्रहण की बँधा मूढ़ बन्धन में। सच पूछो, तो शर में ही बसती है दीप्ति विनय की सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की। सहनशीलता, क्षमा, दया को तभी पूजता जग है बल का दर्प चमकता उसके पीछे जब जगमग है।