Indian soldiers in Galwan Valley : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनकडून (China) गलवान खोऱ्यात त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. चीनच्या या कृतीनंतर आता भारतीय सैन्यानेही (Indian soldier) जशास तसे उत्तर देत गलवान खोऱ्यात भारताचा ध्वज फडकवला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून ध्वज फडकवण्यात आल्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.  






भारताच्या हद्दीत नेहमीच घुसखोरी करणाऱ्या चीनची आगळीक अद्याप सुरूच आहे. जवळपास दीड वर्षापूर्वी भारत-चीन सैन्यादरम्यान संघर्ष झालेल्या गलवान खोऱ्यात चीनने त्यांचा राष्ट्रध्वज फडकवल्याचा दावा केला होता. 2020 मध्ये लडाख पूर्वमध्ये चीनने आगळीक करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव निर्माण केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणाव सुरूच आहे. यातच त्यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गलवान खोऱ्यात त्यांच्या देशाचा ध्वज फडकवल्याचा दावा केला होता. चीनच्या या आगळीकीनंतर भारतीय सैन्यानेही याच ठिकाणी आपला ध्वज फडकवला आहे. 





चीनने नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच व्हायरल केलेल्या व्हिडीओत त्यांच्या सैन्याने गलवान खोऱ्यात चीनचा राष्ट्रध्वज फडकवत राष्ट्रगीत म्हटले असल्याचा दावा करण्यात आला होता. पत्रकार शॅन शिवेई यांनी ट्वीट करून याबाबत सांगितले होते की, नवीन वर्षात गलवान खोऱ्यात चिनी ध्वज फडकला आहे. तिएनमान चौकानंतर गलवानमध्ये चिनी राष्ट्रध्वज फडकवला जाणे विशेष बाब असल्याचे म्हटले होते.


चीनच्या कृतीनंतर राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
गलवान खोऱ्यात ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ चीनकडून व्हायरल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एक ट्विट करून, "गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, चीनला उत्तर द्यावं लागेल, मोदीजी मौन सोडा, असे म्हटले होते.  


महत्वाच्या बातम्या