जम्मू-काश्मीर: पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद झाल्यानंतर भारतानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यात पाकिस्तानच्या काही रेंजर्संना ठार करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.


पाकिस्तानने पहाटे कृष्णा घाटी परिसरात छुप्या पद्धतीने हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या दोन भारतीय जवानांचा पाकिस्तानी रेंजर्सनी शिरच्छेद केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन फोर्स म्हणजेच बॅटनं जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. नायब सुभेदार परमजीत सिंह आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर अशी शहीद झालेल्या भारतीय जवानांनी नावं आहेत. तर 3 गंभीर जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत.

कॅश व्हॅनवर दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरुच आहेत. एटीएमसाठी कॅश घेऊन जात असलेल्या व्हॅनवर दहशतवाद्यांनी काल (सोमवारी) हल्ला केला होता. यामध्ये पाच पोलीस कर्मचारी आणि दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. तर 50 लाखांची रोकडही दहशतवाद्यांनी लुटली.

पोलिसांकडे असलेली शस्त्रही दहशतवाद्यांनी पळवली होती. पोलिसांकडील 5 एके 47 रायफल दहशतवाद्यांनी पळवल्या. दरम्यान, पोलिसांकडून अद्याप रोकड लुटल्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना