श्रीनगर : पाकिस्तानने पहाटे कृष्णा घाटी परिसरात छुप्या पद्धतीने हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. या हल्ल्यानतंर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन फोर्स म्हणजे BAT ने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली.
भारतानेही या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं म्हटलं आहे.
कॅश व्हॅनवर दहशतवादी हल्ला
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरुच आहेत. एटीएमसाठी कॅश घेऊन जात असलेल्या व्हॅनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये पाच पोलीस कर्मचारी आणि दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. तर 50 लाखांची रोकडही दहशतवाद्यांनी लुटली.
पोलिसांकडे असलेली शस्त्रही दहशतवाद्यांनी पळवली आहेत. पोलिसांकडील 5 एके 47 रायफल दहशतवाद्यांनी पळवल्या. दरम्यान पोलिसांकडून अद्याप रोकड लुटल्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.