Indian Army Cheetah Helicopter Crash : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे.  यामध्ये पायलटसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सह पायलट गंभीर जखमी झाला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आजारी जवानाला आणण्यासाठी गेलेले सैन्याचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. 


बीएसएफच्या आजारी जवानाला आणण्यासाठी शुक्रवारी सैन्याचे हेलिकॉप्टर ‘चीता’ उत्तर कश्मीरमध्ये गुरेज सेक्टरमध्ये गेले होते. या हेलिकॉप्टरला दुर्घटना झाली. या अपघातामध्ये पायलटसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सह पायलाट गंभीर जखमी झाला आहे.  भारतीय लष्कराकडून याची माहिती देण्यात आली आहे. 


या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरबाबत आणखी सविस्तर माहिती आलेली नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,   हेलिकॉप्टर उतरणार होते, तेव्हा खराब वातावरणामुळे पायलटचे नियंत्रण सुटले आणि दुर्घटना झाली. उत्तर कश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये हेलिकॉप्टरला दुर्घटना झाली आहे. दरम्यान, घटनास्थळावर मदतकार्य पाठवण्यात आले आहे. बचावकार्य वेगाने सुरु आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.   






महत्वाच्या बातम्या :


 Maharashtra Budget 2022 : शिवरायांना वंदन करुन अजितदादांनी मांडला अर्थसंकल्प; छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी
 Maharashtra Budget :'निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई' बजेट मांडताना अजितदादांचा शायराना अंदाज; दहा महत्वाच्या घोषणा
 Maharashtra Agriculture Budget Highlights : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?
 Maharashtra Budget 2022 LIVE : आरोग्य क्षेत्रासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी : अर्थमंत्री अजित पवार


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live