Indian Army Recruitment 2022 Last Date : भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय लष्कराच्या SSC म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती सुरु  केली आहे. यामध्ये पुरुषांच्या 59व्या अभ्यासक्रमासाठी (59th Men Course) आणि महिलांच्या 30व्या अभ्यासक्रमासाठी (30th Women Course) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार भारतीय लष्कर SSC भर्ती 2022 (Indian Army SSC Recruitment 2022) साठी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी 8 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.


'या' पदांसाठी केली जाणार भरती
या भरतीद्वारे भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एकूण 191 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अविवाहित पुरुषांसाठी 175 पदे, अविवाहित महिलांसाठी 14 पदे आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी 2 पदे समाविष्ट करण्यात आली आहेत.


अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख


भारतीय लष्करातील या भरतीसाठी 8 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.


वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्ष दरम्यान असावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.


निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांना जॉइनिंग लेटर सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अधिकारी म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाईल.


असा करा अर्ज



  1. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.

  2. त्यानंतर होम पेजवर ऑफिसर सिलेक्शन सेक्शनमध्ये दिलेल्या ऑफिसर एंट्री अप्लाय/लॉग इनवर क्लिक करा.

  3. येथे उमेदवारांना प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.

  4. यानंतर उमेदवार लॉग इन करून अर्ज करू शकतात.

  5. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha