नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने  पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या एअर स्ट्राईकने भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. भारताकडून या हल्ल्याबाबत अद्याप याला दुजोरा मिळाला नसला तरी भारताच्या हल्ल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


या कारवाईत भारताने आपल्या मिराज-2000 या विमानांचा वापर केला आहे. मिराज-2000 विमान शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या विमानांद्वारे एका तडाख्यात शत्रूंच्या अड्ड्यांना नेस्तनाबूत करून टाकण्याची शक्ती असते. इस्रायली तंत्रज्ञानाने सज्ज लेझर गाईडेड मिसाईल या मिराज 2000 मध्ये आहेत.
काय आहे मिराज 2000 फ्रांसिसी लढाऊ विमान

काय आहे मिराज 2000 फ्रांसिसी लढाऊ विमान

डसॉल्ट मिराज 2000 एक फ्रांसिसी लढाऊ विमान आहे.

या विमानाला वज्र विमान असेही नाव दिले आहे.

हे विमान वायू सेनेचे प्रायमरी विमान आहे.

हे विमान शत्रूंच्या इलाक्यात लेजर गायडेड बॉम्बने हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

सध्या  भारतीय सेनेकडे 51 मिराज विमान आहेत.

भारतीय सेनेमध्ये 1985 मध्ये ही  विमानं सहभागी झाली.

14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.