नवी दिल्ली : बोईंग या अमेरिकन एरोस्पेस कंपनीने शनिवारी (27 जुलै) 22 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्सपैकी 4 हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेकडे सोपवली आहेत. पुढील आठवड्यात आणखी चार हेलिकॉप्टर भारतात दाखल होतील.
बोईंगतर्फे सांगण्यात आले आहे की, एएच 64ई या श्रेणीतील 4 हेलिकॉप्टर भारतीय वायूसेनेकडे सुपूर्द केली आहेत. 4 हेलिकॉप्टर पुढील आठवड्यात पाठवणार आहोत. दोन आठवड्यांनी अजून 8 हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या पठाणकोट तळावर दाखल होतील. उर्वरीत हेलिकॉप्टर्स सप्टेंबर महिन्यात भारतात दाखल होतील.
एएच 64ई अपाचे हे जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमान आहे. अमेरीकन वायुसेना सध्या याच हेलिकॉप्टर्सचा सर्वाधिक वापर करत आहे. 2015 मध्ये भारतीय वायुसेनेने अमेरिकन सरकार आणि बोईंग कंपनीशी 22 अपाचे हेलिकॉप्टर्ससाठी कोट्यवधी डॉलर्सचा करार केला होता. परंतु त्यानंतर काही वर्षे त्यामध्ये काही अडथळे आले. आज अखेर हेलिकॉप्टर्स भारतात दाखल झाली आहेत.
भारतीय वायुसेनेची ताकद अजून वाढली, अत्याधुनिक लढाऊ अपाचे हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2019 11:55 PM (IST)
बोईंग या अमेरिकन एरोस्पेस कंपनीने शनिवारी (27 जुलै) 22 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्सपैकी 4 हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेकडे सोपवली आहेत. पुढील आठवड्यात आणखी चार हेलिकॉप्टर भारतात दाखल होतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -