चेन्नई : भारतीय वायूसेनेचं विमान बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. चेन्नईहून पोर्टब्लेअरच्या दिशेने निघालेल्या या विमानात 29 जण आहेत.
या विमानाशी अनेक तासांपासून संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
AN-32 या विमानात 6 क्रू मेंबरसह 29 जण आहेत. वायूसेनेचं हे वाहतूक विमान आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास या विमानाने चेन्नईच्या तंबराम इथून उड्डाण केलं. उड्डाणाच्या 16 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला.
हे विमान इंधनाची टाकी भरल्यानंतर 4 तास हवेत राहू शकतं. मात्र इतक्या तासानंतरही या विमानाशी संपर्क होऊ न शकल्यामुळे काळजीत भर पडली आहे.
सध्या तटरक्षक दल आणि वायूदलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही.