रजनीकांत यांचा 'कबाली' आज देशभरात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतून हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
दक्षिण भारतात रजनीकांत यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. चेन्नईत या सिनेमाची तिकीटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी अगदी रात्रीपासून गर्दी केली होती. आज सकाळी 4 वाजताच हा सिनेमा रिलीज करण्यात आला.
कबाली प्रदर्शित होणार म्हणून बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली असून सिनेमाची तिकीटंही वाटली आहेत. परंतु बल्क बुकिंगमुळे बऱ्याच चाहत्यांना तिकीटं मिळू शकली नाहीत.
'कबाली' भारतातील तब्बल 4000 चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार असून त्याची पुढील 3 दिवसांचं बुकिंग हाउसफुल्ल आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड 'कबाली' मोडीत काढेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.