नवी दिल्ली : काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून आंतरराष्ट्रीय मदत थांबवण्यासाठीचे प्रयत्न भारताने सुरु केल्या आहेत.
दहशतवादी कारवाईसाठी वित्त पुरवठा करणाऱ्यांवर लक्ष ठेवणारी आतंराष्ट्रीय संस्था म्हणजे फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ). याच एफएटीएफला भारत पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे देणार आहे. जेणेकरुण पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणून त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करता येईल.
जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानमधील दहशत संघटनेने पुलवामामध्ये हल्ला केला होता. या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानकडून मदत करण्यात आल्याचे दस्तावेज जमा करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शिवाय पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचं घटनाक्रम पण या दस्तावेजमध्ये देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये पुढील आठवड्यामध्ये एफएटीएफचं महाधिवेशन आणि बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भारत पाकिस्तानच्या विरोधात जमा केलेले दस्तावेज दाखवून पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार आहे.
पाकिस्तान काळ्या यादीत गेल्यास आयएमएफ. जागतिक बँक, युरोपीयन संघ सारखे बहुपक्षीय कर्जदाता त्याची ग्रेडिंग कमी करु शकतात. शिवाय मूडीज, एस अँन्ड पी आणि फिच सारखे एजन्सीज त्याची रेटिंग कमी करु शकतात. एफएटीएफने यापूर्वी जुलै 2018 मध्ये पाकिस्तानला संशयित वाल्या ग्रे यादीत टाकलं होतं. सध्या उत्तर कोरिया आणि ईराण एफएटीएफच्या काळ्या यादीत आहे.
पाकिस्तानला भारत एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या तयारीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2019 12:15 PM (IST)
एफएटीएफला भारत पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे देणार आहे. जेणेकरुण पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणून त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करता येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -