ट्रेंडिंग
सावधान! देशातील वातावरणात बदल, पुढील 6 ते 7 दिवस तुफान पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय असणार पावसाची स्थिती?
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात मान्सूनपूर्ण पावसाला (Rain) जोरदार सुरुवात झाली आहे.
Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला (Rain) जोरदार सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणसह गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज
दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि 23 मे 2025 च्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून म्हणजे 22 ते 24 मे 2025 रोजी कोकण आणि गोव्यात आणि 24 मे 2025 रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 2 ते 3 दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती
पुढील 2 ते 3 दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. 22 ते 26 मे 2025 रोजी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र लाटांची परिस्थिती आहे. 22 आणि 23 मे 2025 रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.