IND vs ENG 1st Test Live Updates | पहिल्या कसोटीत भारताची 227 धावांनी हार....

IND vs ENG Live Cricket Score Chennai 1st Test Live Updates | भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Feb 2021 01:44 PM
इंग्लंड विरोधातल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा दुसरा डाव 192 धावांवर संपुष्टात आला असून 227 धावांनी हार झाली आहे.
टीम इंडियाची अवस्था बिकट, सहा गडी बाद
शुभमन गिल वगळता सर्व खेळाडूंची निराशाजनक कामगिरी इंग्लंडला विजयासाठी फक्त चार विकेटांची आवश्यकता असून सामन्यात अजून 66 षटकांचा खेळ बाकी
अवघ्या 12 धावा करुन रोहित शर्मा तंबूत माघारी. भारताची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा.
इंग्लंडचं आव्हान स्वीकारत भारतीय क्रिकेट संघ खेळपट्टीवर. रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीच्या फलंदाजांवर संघाला भक्कम सुरुवात करुन देण्याची जबाबदारी
अश्विनच्या खात्यात आणखी एक विकेट. इंग्लंडची धावसंख्या सर्वबाद 178; संघाकडे 419 धावांची आघाडी. भारतीय संघाच्या खेळीवर क्रीडारसिकांचं लक्ष. यजमानांना विजयासाठी 420 धावांची गरज
रविचंद्रन अश्विनच्या खात्यात पाचवी विकेट. इंग्लंडचे 9 खेळाडू माघारी. संघाची धावसंख्या 9 गडी बाद 178 धावा
408 धावांची आघाडी; इंग्लंडचे 8 खेळाडू माघारी, आर अश्विनच्या खात्यात आणखी एक विकेट
इंग्लंडचा सातवा खेळाडू तंबूत परत; बटलर माघारी. नदीमला आणखी एक विकेट मिळवण्यात यश.
इंग्लंडच्या संघाकडे 401 धावांची आघाडी. इंग्लंडचा संघ खेळी घोषित करणार का, याकडेच साऱ्यांचं लक्ष
नदीमच्या चेंडूवर रोहित शर्माला झेल देत पोप तंबूत परत. इंग्लंडच्या संघाला सहावा धक्का. पाहुण्या संघाच्या फलंदाजीचा वेग मंदावला
बुमराहच्या गोलंदाजीवर जो रुट 40 धावा करुन बाद झाला. इंग्लंडने आपली पाचवी विकेट गमावली. इंग्लंडची धावसंख्या आता 115 इतकी झाली आहे. अजूनही इंग्ंलडकडे 356 धावांची आघाडी आहे.
इंग्लंडला आणखी एक धक्का बसला असून अश्विनने स्टोक्सला सात धावांवर बाद केलं आहे. आता इंग्लंडची धावसंख्या चार बळींच्या बदल्यात 78 इतकी झाली आहे.


इंग्लंडला तिसरा धक्का बसला असून इशांत शर्माने लॉरेन्सला 18 धावांवर आऊट केलं आहे. दुसऱ्या बाजूला रुट 21 धावांवर खेळत असून इंग्लंडची धावसंख्या 65 झाली आहे. इशांत शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 300 बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय गोलंदाज आहे.
अश्विनने इंग्लंडची दुसरी विकेट पटकावली असून त्याने सिब्लेला माघारी पाठवलं आहे. इंग्लंडची धावसंख्या आता दोन विकेट्सच्या बदल्यात 32 झाली आहे. लॉरेन्स 13 धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात द्विशतकीय खेळी करणारा रुट आता मैदानात आला आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून अश्निनने आपल्या पहिल्या चेंडूवरच रोरी बर्न्सला माघारी पाठवलं आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून अश्निनने पहिली विकेट पटकावली आहे. इंग्लंडने अद्याप खातं खोललं नाही. भारतीय फिरकीपट्टूंनी जबरदस्त माऱ्याला सुरुवात केली आहे.
भारतीय संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली असून पहिला डाव 337 धावांवर आटोपला आहे. वॉशिग्टन सुंदरने चमकदार खेळी करत 85 धावा केल्या. इंग्लंडला 241 धावांची आघाडी मिळाली आहे.
इशांत शर्मा आऊट झाला असून भारतालाआठवा धक्का बसलाय. भारताची धावसंख्या 323 झाली आहे. सुंदर 71 धावांवर खेळत आहे. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी अद्याप 55 धावांची गरज आहे.
भारताला नदीमच्या रुपात आठवा धक्का बसला असून धावसंख्या 323 झाली आहे. सुंदर 64 धावांवर खेळत असून त्याला साथ देण्यासाठी इशांत शर्मा मैदानात आला आहे. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी अद्याप 55 धावांची गरज आहे.
भारताला सातवा धक्का बसला असून आर अश्विन 31 धावांवर बाद झाला आहे. दुसऱ्या बाजूला वॉशिग्टन सुंदर 58 धावांवर खेळत असून भारताची धावसंख्या आता 305 झाली आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला अजून 73 धावांची गरज आहे.
वॉशिंग्टन सुंदरने आपले अर्धशतक पूर्ण केलं असून भारतीय संघ आता फॉलोऑनची नामुष्की टाळण्याकडे वाटचाल करत आहे.
सुंदर आणि अश्विन फलंदाजी करत आहेत. सुंदरने दोन चौकार तर अश्विनने एक षटकार मारला आहे. भारताची धावसंख्या आता सहा विकेट्सच्या बदल्यात 273 इतकी झाली असून फॉलोऑनची नामुष्की टाळायची असेल तर अजून 105 धावांची गरज आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून तिसरा दिवस हा इंग्लंडचा राहिला आहे. भारताची धावसंख्या ही सहा विकेट्सच्या बदल्यात 257 इतकी झाली आहे. इंग्लंडच्या 578 धावांच्या तुलनेत भारत अजूनही 321 धावांनी पिछाडीवर आहे. सुंदर 33 धावांवर तर अश्विन आठ धावांवर नाबाद आहेत.
सुंदर 24 धावा तर अश्विन आठ धावांवर खेळत आहेत. या दोघांमध्ये 72 चेंडूत 19 धावांची भागीदारी झाली आहे. भारताची धावसंख्या आता सहा खेळाडूंच्या बदल्यात 244 झाली आहे.


ऋषभ पंत 91 धावा करुन बाद झाला. त्यामुळे भारताच्या सहा विकेट्स गेल्या असून अजूनही भारत इंग्लंडपेक्षा 351 धावांनी पिछाडीवर आहे. आर अश्विन मैदानात आला असून सुंदर 15 धावांवर खेळत आहे.
भारताला मोठा झटका बसला असून पुजारा 73 धावांवर आऊट झाला आहे. आता भारताची धावसख्या पाच विकेट्सच्या बदल्यात 192 इतकी झाली आहे.

पुजाराच्या आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या सुंदरने चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने तीन चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या आहेत. तरल दुसरीकडे पंतने चमकदार कामगिरी करत 86 धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्या आता पाच विकेट्सच्या बदल्यात 220 झाली आहे.
भारताची धावसंख्या 154 झाली असून चार विकेट्स गेल्या आहेत. पंतने 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं असून त्याने भारतीय डाव सावरला आहे. दुसरीकडे पुजारा संयमाने फलंदाजी करत असून त्याने 53 धावा केल्या आहेत.
भारताची धावसंख्या 20 षटकांनंतर 67 झाली आहे. दोनही सलामीवीर बाद झाल्याने विराट आणि पुजारावर मोठी जबाबदारी आहे. विराट कोहली 9 धावांवर तर पुजारा 23 धावांवर खेळत आहे.
लंच ब्रेकपर्यंत भारतासमोरील अडचणीत वाढ झाली असून दोनही सलामीवीर बाद झाले आहेत. भारताची धावसंख्या दोन विकेट्सच्या बदल्यात 59 धावा आहे. गीलने 29 धावा तर रोहित शर्माने 6 धावा केल्या आणि ते बाद झाले. मैदानात पुजारा 20 धावांवर खेळत असून कर्णधार विराट कोहली 6 धावांवर खेळत आहेत.
इंग्लंडची नववी विकेट पडली असून त्यांची धावसंख्या 577 झाली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून कर्णधार कोहलीने अश्विनला गोलंदाजीसाठी उतरवलं आहे. लीच मैदानात आहे आणि त्याने 28 चेंडूत 6 धावा केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला बेस आहे, त्याने 28 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडचे 8 खेळाडू तंबूत परतल्याचं पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 555 वर पोहोचली आहे. त्यामुळं आता तिसऱ्या दिवसाकडे क्रीडारसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
खेळपट्टीवर येताच जोफ्रा आर्चरला क्षणाचाही विलंब न लावता इशांतनं माघारी धाडलं. एकही धाव न करता आर्चर त्रिफळाचीत. इंग्लंडची धावसंख्या 8 गडी बाद 525 धावा
इंग्लंडला सातवा झटका. जोस बटलर 3 धावांवर त्रिफळाचीत. इशांत शर्मानं मिळवली विकेट.
इंग्लंडनं ओलांडला 500 धावांचा आकडा
इंग्लंडची धावसंख्या 6 गडी बाद 485 धावा. खेळपट्टीवर जोस बटलर आणि डोमिनीक बेस हे दोन नवे खेळाडू.
इंग्लंडकडून धावसंख्येचा डोंगर, जो रुट अखेर तंबूत परत. नदीमच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू विकेट देत जो रुट 218 धावांवर बाद झाला.
दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडच्या 4 बाद 454 धावा, रुट 29 तर पोप 24 धावांवर नाबाद, इंग्लंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
IND vs ENG 1st Test Live Updates | कर्णधार ज्यो रुटचं दीडशतक तर बेन स्टोकचं अर्धशतक, दोघांची शतकी भागिदारी, इंग्लंडची धावसंख्या साडेतीनशेपार,
IND vs ENG 1st Test Live Updates | बेन स्टोक 82 धावांवर बाद, इंग्लंडला चौथा धक्का, इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 387
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटचं शानदार द्विशतक, पोपसोबत चांगली भागीदारी, इंग्लंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
इंग्लंडची धावसंख्या तीनशेपार, कर्णधार ज्यो रुटचं दीडशतक, बेन स्टोकही स्थिरावला, इंग्लंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
इंग्लंडची धावसंख्या तीनशेपार, रुट दीडशतकाजवळ तर स्टोकही स्थिरावला, इंग्लंडचा स्कोर 3 बाद 313
भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार ज्यो रुटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडच्या संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखलं आहे. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक (128) ठोकलं, पण सिबली मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 87 धावांवर बाद झाला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडची फलंदाजी भक्कम स्थितीत
भारतीय संघाला मोठं यश. स्थिरस्थावर भागीदारी तोडण्यात बुमराहला यश. सिब्ले 87 धावांवर बाद.
85 षटकांच्या खेळानंतर इंग्लंडची धावसंख्या 250. सिब्ले आणि रुट खेळपट्टीवर स्थिरावल्यामुळं इंग्लंडची बाजू भक्कम.
164 चेंडूंमध्ये जो रुटचं शतक. 100 व्या कसोटीमध्ये झळकावलं शानदार शतक.
जो रुटची शतकी खेळी. इंग्लंडची धावसंख्या 2 गडी बाद, 227 धावा. भारतीय गोलंदाज काहीसे अडखळताना दिसत आहेत.
70 षटकांच्या खेळानंतर इंग्लंडची धावसंख्या 2 गडी बाद, 180 धावा. रुट आणि सिब्ले भारतीय गोलंदाजापुढं आव्हान उभं करताना
64 षटकांच्या खेळानंतर इंग्लंडची धावसंख्या 2 गडी बाद 163 धावा. सिब्ले आणि रुटची शतकीय भागीदारी
चहापानापर्यंत इंग्लंड 140 धावांवर 2 विकेट्स, दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा दबदबा, सिब्ले 53 तर रुट 45 धावांवर खेळतोय.
लंच ब्रेकआधी इंग्लंडला दोन धक्के, इंग्लंड 2 बाद 67 धावा, अश्विनने बर्न्सला तर बुमराहने लॉरेन्सला पाठवले तंबूत, बर्न्स 33 तर लॉरेन्स शून्यावर बाद
सलामीवीर सिब्लेचं अर्धशतक, इंग्लंडची धावसंख्या दोन बाद 125, सिब्ले (51)आणि रुटची (33) जोडी स्थिरावली
सुरुवातीच्या 12 षटकांनंतर इंग्लडने 26 धावा केल्या आहेत. त्यामध्ये बर्न्स 12 धावांवर तर सिबले 13 धावांवर खेळत आहेत. बुमराह आणि अश्विन गोलंदाजी करत आहेत.
भारत आणि इंग्लंड दरम्यान पहिला कसोटी सामना, इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
टीम इंडियाला जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी विश्चचषक (विश्व टेस्ट चॅम्पियनशिप) (डब्ल्यूटीसी) च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत कमीत कमी दोन कसोटी जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंड विरोधात जर भारतानं 1-0 नं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियासाठी फायनलला जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं घरच्या मैदानावर इंग्लंडला 2-0 नं हरवणं आता टीम इंडियाला अत्यावश्यक झालं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे. या मालिकेत मोठा विजय मिळवणं अनेक कारणांसाठी महत्वाचं आहे.
चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर भारताची कामगिरी शानदार आहे. गेल्या 22 वर्षापासून टीम इंडिया या मैदानावर जिंकत आहे. परंतु या वेळी इंग्लंडचं भाराताला आव्हान असणार आहे, भारतीय संघ 1999 साली चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानकडून 12 धावांनी भारतीय संघ पराभूत झाला होता. या सामन्यानंतर संघाने 8 सामने या मैदानावर खेळले त्यातील 5 सामने जिंकले असून दोन सामने ड्रॉ झाले.

पार्श्वभूमी

India vs England :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. आज सकाळी 9.30 वाजता टॉस होईल. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर भारताची कामगिरी शानदार आहे. गेल्या 22 वर्षापासून टीम इंडिया या मैदानावर जिंकत आहे. परंतु या वेळी इंग्लंडचं भाराताला आव्हान असणार आहे,


 


भारतीय संघ 1999 साली चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानकडून 12 धावांनी भारतीय संघ पराभूत झाला होता. या सामन्यानंतर संघाने 8 सामने या मैदानावर खेळले त्यातील 5 सामने जिंकले असून दोन सामने ड्रॉ झाले.


 


चेपॉक स्टेडियमचे पिच पाहता भारतीय संघ पहिल्या सामन्यात तीन स्पीनर्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करू शकते. आर अश्विनसह वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मिडल ऑर्डर सांभाळतील. विकेटकिपींगची जबाबदारी ऋषभ पंतला मिळण्याची शक्यता आहे.


 


संभाव्य संघ


 


भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह


 


इंग्लंड - रोरी बर्न्स, डोमनिक सिब्ले, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), ओली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स एंडरसन आणि जोफ्रा आर्चर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.