नवी दिल्ली : आकाशातून शत्रूला टिपण्याची भारताची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. कारण की, ब्राह्मोससारखं संहारक क्षेपणास्त्र सुखोईमधून यशस्वीरित्या डागण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र लढाऊ विमानातून डागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भारताच्या हवाई दलाची ताकद कित्येक पटींनी वाढली आहे.

सुखोई  30 -एमकेआय या विमानातून ही चाचणी करण्यात आली. बंगालच्या उपसागरात ही चाचणी पार पडली. आजच्या यशस्वी चाचणीमुळं 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्र जमीन, पाणी व हवेतून डागता येऊ शकते हे सिद्ध झालं आहे.

या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओला शुभेच्छा दिल्या आहेत.