इंफाळ : व्हीव्हीआयपींमुळे विमानाला उशीर झाल्याचं तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल. केंद्रीय मंत्री केजे अल्फोन्स यांच्यामुळेही एका विमानाला उशीर झाला. मात्र या विमानाने प्रवास करणाऱ्या एका महिला डॉक्टरने अल्फोन्स यांचा तिखट शब्दात समाचार घेतला.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका कार्यक्रमासाठी मणिपूरला येणार होते, ज्यामध्ये अनेक केंद्रीय मंत्रीही हजर राहणार होते. व्हीव्हीआयपी मूव्हमेंटमुळे तीन विमानांना उशीर झाला. कारण राष्ट्रपतींचं विमान येणार होतं, अशी माहिती इंफाळ विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिली.

विमानाला उशीर झाल्याने महिला डॉक्टरचा पारा चढला. मला पाटण्याचा जायचंय. माझ्यासाठी एका प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचे थांबवले आहेत. मी वेळेवर गेले नाही तर प्रेत सडू शकतं. मी एक डॉक्टर आहे. मृतदेह अजूनही घरातच आहे, असं महिला डॉक्टरने ओरडू ओरडू सांगितलं.

दरम्यान अल्फोंस यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. महिलेला एका अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं. मात्र विमानाला उशीर झाल्यामुळे ती हतबल होती. ती सारखी रडत होती. तिने माझ्याकडे मदतीसाठी संपर्क केला. भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी हस्तक्षेप करावा, अशी महिलेची इच्छा होती, असं स्पष्टीकरण अल्फोंस यांनी दिलं.

पाहा व्हिडिओ :

https://twitter.com/ANI/status/933288831767363584