India’s First Night Sky Sanctuary : देशात पहिलं 'नाईट स्काय अभयारण्य' (Night Sky Sanctuary) उभारण्यात आहेत. लडाखमध्ये (Ladakh) देशातील पहिली 'नाईट स्काय सँच्युअरी' (Night Sky Sanctuary) उभारण्यात येत आहे. हे अभयारण्य लडाखमधील हेन्ली येथील थंड वाळवंटात उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. हे देशातील पहिलं 'नाईट स्काय अभयारण्य' असेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे की, लडाखमधील हेन्ली येथे डार्क स्काय रिझर्व्ह उभारण्यात येणार आहे. हे ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गॅमा-रे दुर्बिणीसाठी जगातील सर्वोच्च ठिकाणांपैकी एक असेल.


लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आरके माथूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं आहे की 'डार्क स्काय रिझर्व्ह' (Dark sky reserve) साइट विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देईल. नुकतेच केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिल (LAHDC) लेह आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) यांनी डार्क स्काय रिझर्व्ह सुरू करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.


या प्रकल्पासाठी हेन्ली सर्वोत्तम ठिकाण


नाईट स्काय सँच्युअरीसाठी (Night Sky Sanctuary) हेन्ली हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कारण येथे दूर-दूरपर्यंत मानवी वस्ती नाही. त्यामुळे थंड वाळवंटात चांदण्यांच्या प्रकाशात सुंदर आकाशाचं निरीक्षण करता येईल. रात्रीच्या आकाशाचे प्रकाश, प्रदूषण आणि रोषणाईपासून संरक्षण करण्यासाठी सर्व स्टेक होल्डर एकत्रितपणे काम करतील, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. कारण तो वैज्ञानिक आणि नैसर्गिकरित्या एक गंभीर धोका आहे. लडाखच्या थंड वाळवंटी प्रदेशात हेनली प्रकल्पासाठी सर्वात योग्य आहे. इथे लोकांची गर्दी नाही. तसेच संपूर्ण वर्षभर आकाश निरभ्र आणि कोरडे हवामान असते.


नाईट स्काय अभयारण्य म्हणजे काय?


नाईट स्काय सँच्युअरी म्हणजे अभयारण्य जिथे खुल्या आकाशात चांदण्या पाहता येतात. येथे प्रकाश नसतो. या परिसरात प्रकाश प्रदूषणाला (Light Pollution) प्रतिबंध असतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या