MQ-9B Drone : भारताने (India) यूएस (United States) सरकारला 31 सशस्त्र MQ-9B हंटर किलर ड्रोनसाठी औपचारिक विनंती केली आहे,  9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि जो बायडेन (Joe Biden) यांच्यातील बैठकीपूर्वी भारताने अमेरिकेकडून मागवले 31 'हंटर किलर' ड्रोन मागवले आहेत, जेणेकरून चालू आर्थिक वर्षात अंतिम करारावर स्वाक्षरी करता येईल.



अमेरिकेकडून मागवले 31 'हंटर-किलर
काही दिवसांपूर्वी भारताच्या संरक्षण मंत्रालयाने 31 'हंटर-किलर' खरेदीसाठी तपशीलवार LOR (लेटर ऑफ रिक्वेस्ट) पाठवले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनुसार, बायडेन प्रशासन परदेशी लष्करी विक्री कार्यक्रमाअंतर्गत भारताच्या या विनंतीवर एक किंवा दोन महिन्यांतच प्रतिसाद देईल. असे सांगण्यात येत आहे. 



MQ-9B ची ताकद किती आहे?


एका रिपोर्टनुसार, एकूण 31 ड्रोनपैकी 15 भारतीय नौदलाला आणि प्रत्येकी आठ लष्कर आणि हवाई दलाला देण्यात येणार आहेत. MQ-9B रीपर तसेच प्रिडेटर ड्रोन हे अमेरिकन कंपनी जनरल अ‍ॅटोमिक्सने बनवलेले मानवरहित हवाई वाहन आहे. यूएस एअर फोर्स त्याचा वापर करते. हे MQ-1 सीरीजमधील ड्रोन आहे, ज्याचा विकास 1990 च्या दशकात सुरू झाला.



सी गार्डियन आणि स्काय गार्डियन ड्रोन
भारत खरेदी करत असलेल्या दोन ड्रोनपैकी सी गार्डियन हे सागरी देखरेखीसाठी खास आहे, तर स्काय गार्डियन ड्रोनचा वापर जमिनीच्या सीमेच्या रक्षणासाठी केला जाईल. सी गार्डियन ड्रोन हा भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या ताफ्यात समाविष्ट केला जाईल. सागरी देखरेख असो किंवा जमिनीवरील युद्ध असो, हे ड्रोन अनेक भूमिकांसाठी योग्य आहे.



MQ-9B ची ताकद जाणून घ्या -
या ड्रोनमध्ये 40000 फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता आहे. 
एवढेच नाही तर लांब पल्ल्याच्या गुप्तचर माहिती गोळा करणे आणि पाळत ठेवणे
यासोबतच ही विमाने एअरबोर्न अर्ली वॉर्निंग, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, 
अँटी-सरफेस वॉरफेअर आणि अँटी-सबमरीन वॉरफेअरमध्ये वापरली जाऊ शकतात. 
हे ड्रोन एकावेळी सुमारे तीस ते चाळीस तास हवामानाचा परिणाम न होता उडू शकतात.
एकूण 31 ड्रोनपैकी 15 भारतीय नौदलाला आणि प्रत्येकी आठ लष्कर आणि हवाई दलाला देण्यात येणार आहेत.


 


G-20 परिषदेपूर्वी भारताचे मोठे पाऊल


G-20 परिषदेपूर्वी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. भारताने 2019 मध्ये हरभरा, कडधान्ये आणि सफरचंदांसह सुमारे अर्धा डझन अमेरिकन उत्पादनांवर लादलेले अतिरिक्त शुल्क हटवले आहे. वित्त मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना 5 सप्टेंबर रोजी जारी केली आहे. भारताने सुमारे अर्धा डझन अमेरिकन उत्पादनांवर 2019 मध्ये लादलेले अतिरिक्त शुल्क हटवले आहे. भारताकडून काही स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर शुल्क वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 2019 मध्ये अमेरिकेच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून भारताने आपल्या 28 उत्पादनांवर हे शुल्क लावले होते. या उत्पादनांमध्ये हरभरा, मसूर, सफरचंद, कवच असलेले अक्रोड, ताजे किंवा वाळलेले, कवचयुक्त बदाम यांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी-20 परिषदेसाठी भारतात येण्यापूर्वी भारताने हे पाऊल उचलले आहे. बायडेन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.


 


इतर बातम्या


Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांवर मोठी कारवाई, संपत्ती जप्त करण्यास सुरुवात