नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशातील रुग्णसंख्येत 35 हजार 662 इतकी भर पडली आहे आणि 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 33 हजार 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल वाढलेल्या नव्या रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये 23 हजार 260 नवीन रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये काल 131 जणांचा मृत्यू झाला आहे. 


शुक्रवारी देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. 


Maharashtra Corona Update : राज्यात काल 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू


कोरोना संबंधी एकूण आकडेवारी :



  • कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 34 लाख 17 हजार 390

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 25 लाख 22 हजार 171

  • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 40 हजार 639

  • एकूण मृत्यू : चार लाख 44 हजार 529


Corona Vaccination : लसीकरणाचा विश्वविक्रम! देशात एकाच दिवसात 2.5 कोटी डोस वितरित


राज्यातील स्थिती 
राज्यात काल  3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 410  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 24 हजार 720  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.08 टक्के आहे. राज्यात काल 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. 


मुंबईत 434 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 434 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 387 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. 


Mumbai Vaccination : मुंबईत महिला लसीकरण विशेष सत्रात 1.27 लाख महिलांना कोविड लस