Coronavirus Cases Today in India : देशात एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतोय, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूही डोकं वर काढताना दिसत आहे. अशात एक दिलासादायक बाब म्हणजे देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे, पण तुलनेन मृत्यूची संख्या वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 20 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सलग आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना संसर्गात घट झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गात घट झाली आहे. रविवारी दिवसभरात 18 हजार 148 कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांवर
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. सध्या देशात 1लाख 50 हजार 877 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.34 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.46 टक्के आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 148 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 32 लाख 28 हजार 670 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
मुंबईत रविवारी 238 रुग्णांची नोंद, 274 कोरोनामुक्त
कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 238 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 274 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रात रविवारी 2015 कोरोना रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2015 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 1916 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. रविवारी राज्यात सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,71,507 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.