Coronavirus Cases Today in India : जगभरातील वाढता कोरोना उद्रेक (Covid19 Updates) पाहता, भारत सरकारकडून सतर्कतेची पाऊले उचलली जात आहेत. नागरिकांना मास्क (Use Mask) वापरण्याचं आणि बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. देशात आज 227 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर भारतात सध्या 3424 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोनाचा संसर्ग कमी असणे, ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेणे गरजेचं आहे. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं तसेच बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.


25 हजार प्रवाशांपैकी 500 जणांची रँडम कोविड चाचणी 


देशात कोरोनाच्या BF.4 चा धोका लक्षात घेता केंद्र सरकार सतर्कतेची पाऊले उचलली जात आहेत. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport) विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. येथे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानंतर विमानतळावर रँडम कोविड चाचणी करण्यात येत आहे. IGI विमानतळावर, दररोज सरासरी येणाऱ्या 25 हजार प्रवाशांपैकी सुमारे दोन टक्के लोकांची रँडम कोविड चाचणी केली जात आहे.






केंद्र-राज्य सरकार अलर्टवर


केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोरोनाचा धोका पाहता सतर्कतेची पाऊले उचलली जात आहेत. केंद्र सरकारने राज्यांना जीनोम सिक्वेंसिंगचेही (Genome Sequencing) आदेश दिले आहेत. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं तसेच बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. काही राज्यांनी खबरदारी म्हणून मास्कसक्ती लागू केली आहे.






दिल्ली विमानतळावर कोविड चाचणी


जेनस्ट्रिंग डायग्नोस्टिक सेंटरच्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल यांच्या मते, दिल्लीच्या दिल्ली विमानतळावर सरासरी 25,000 प्रवासी येतात, त्यापैकी 500 प्रवाशांची रँडम कोविड चाचणी केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले होते की, दिल्लीच्या IGI विमानतळावर चीन, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियासह इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोनाची नमुना चाचणी सुरू करण्यात आली आहे.


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी


चीन, जपानसह इतर देशांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारत सरकार अनेक खबरदारी पाऊले उचलली आहेत. चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांना आता आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल.