ITR Filing Process : तुमचा आयकर परतावा (IT Return) दाखल करणं अद्याप बाकी असेल तर लवकरात लवकर आयटी रिटर्न दाखल करा. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल. सरकारने आयकर परतावा (IT Return) भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर आयकर परतावा दाखल करणाऱ्या व्यक्तींनाा दंड भरावा लागणार आहे. आर्थिक वर्ष 2021-2022 म्हणजेच (आर्थिक वर्ष 2021-2022) आणि मूल्यांकन वर्ष 2022-2023 (मूल्यांकन वर्ष 2022-2023) साठी अंतिम तारीख 31 जुलै 2022 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आयटी रिटर्न भरला नसलेल्या व्यक्तींना लवकर परतावा दाखल करा.


तुम्ही घर बसल्या स्वत: ही आयटी परतावा दाखल करु शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या टीप्स फॉलो कराव्या लागतील. त्या कशा आणि त्यासाठीचे नियम जाणून घ्या.


नियम काय आहेत?


1. जर तुमचं वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांहून कमी आहे आणि तुम्ही 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरलात, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.


2. पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यीं 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.


3. पाच लाख रुपयांहून जास्त उत्पन्न असलेल्यांनी 31 जुलै ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत आपलं आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.


4. पाच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.


घर बसल्या अशा प्रकारे ITR फाइल करा :



  • सर्व प्रथम https://eportal.incometax.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर यूजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) टाका.

  • त्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.

  • फाइल आयकर रिटर्न (File IT Return) पर्यायावर क्लिक करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा.

  • ऑनलाइन (Online) पर्याय निवडा आणि नंतर वैयक्तिक (Personal) पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 फॉर्म निवडा.

  • पगार घेणाऱ्या व्यक्तीला ITR 4 फॉर्मची निवड करावी लागेल.

  • रिटर्न फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, त्यात भरलेल्या प्रकारावर 139(1) निवडा.

  • पुढे, तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये सर्व माहिती भरा.

  • सर्व भरलेल्या माहितीची पडताळणी करा आणि सबमिट करा.

  • फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याचा Confirmation मेसेज तुमच्या मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर येईल.