India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: कश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर, जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आणि पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात पाकिस्तानचे ड्रोन दिसले.
पार्श्वभूमी
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या प्रत्युत्तर कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (12 मे) राष्ट्राला संबोधित केलं. त्याच वेळी, पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर, जम्मू-काश्मीरमधील...More
India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकने पुन्हा छुप्या पद्धतीने कुरापती सुरु केल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील जंगलात मंगळवारी सकाळी दहशतवादी दिसून आले होते. दहशतवादी दृष्टीस पडताच भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु केली होती. यावेळी दहशतवादी आणि भारतीय सैन्य आमनेसामने आले आणि त्यांच्यात चकमक झाली. यानंतर भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते.
India Pakistan War : सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य (India Pakistan War) परिस्थिती असल्याने सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना ड्युटीवर बोलविले.. अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ येथील बीएसएफ (BSF) महिला जवान रेश्मा इंगळे ह्या 15 दिवसाच्या सुट्टीवर आपल्या गावी आल्या होत्या पण त्यांना तातडीने ड्युटीवर हजर व्हायला सांगितले.. यावेळी सिमेवर जातांना त्या महिला जवानाच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून तुमचंही मन सुन्न झाल्याशिवाय राहनार नाही. कारण त्या एका वर्षाच्या बाळाला सोडून देशाच्या रक्षणासाठी गेल्या आहेत.
Opreation Sindoor LIVE: भारतीय सैन्याची ताकद पाहून पाकिस्ताननं आता गुडघे टेकलेत. त्यानं युद्धबंदीची विनंती करायला सुरुवात केली आणि भारताच्या अटी मान्य केल्या आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार जवळजवळ थांबवला. या सगळ्यात, पाकिस्तानला गुडघे टेकवण्यात इस्रोचीही मोठी भूमिका आहे. जेव्हा भारतीय सैन्य पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागत होते, तेव्हा इस्रो पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होतं.
पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत, इस्रोचे 10 उपग्रह सतत पाकिस्तानवर लक्ष ठेवून होते. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी रविवारी (11 मे) उघड केले की देशाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी उपग्रहांचा एक समर्पित गट सतत काम करत आहे, असं द हिंदूने वृत्त दिले आहे. ते म्हणाले, "देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या धोरणात्मक उद्देशाने किमान 10 उपग्रह अहोरात्र सतत कार्यरत आहेत."
PM Modi LIVE: पाकिस्तानचे सर्व मनसुबे नष्ट करुन त्यांची सर्व क्षेपणास्त्र, ड्रोनचा खात्मा करणाऱ्या ऑपरेशन सिंदूरमधील योद्ध्यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाबासकी दिली आहे.
India Pakistan War LIVE: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये सीमारेषेपासून 100 किलोमीटर आत असलेल्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळाचाही समावेश होता. भारताने क्षेपणास्त्र डागून हे सर्व तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये जवळपास 100 दहशतवादयांचा खात्मा झाला होता. भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे पाकिस्तान चांगलाच चवताळला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने 7 ते 10 मे या कालावधीत भारतावर ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला होता. भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 11 हवाई उद्ध्वस्त झाले होते. यावेळी 11 पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची कबुली पाकच्या सैन्याने दिली आहे. तसेच भारताच्या हल्ल्यात आपले 78 सैनिक जखमी झाल्याचेही पाकिस्तानकडून सांगण्यात आले.
Operation Sindoor : यापुढे दहशतवाद आणि व्यापार एकसोबत चालणार नाही, पाणी आणि रक्त एकासोबत वाहणार नाही. यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावरच होणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही, त्याच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशाराही नरेंद्र मोदी यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित करण्यात आलं आहे, गरज पडल्यास ते पुन्हा सुरू करणार असं मोदी म्हणाले.
India Pakistan Ceasefire LIVE: जम्मू विभागातील दोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आज 13 मे 2025 रोजी उघडतील. तथापि, कठुआ, जम्मू, राजौरी, पूंछ, सांबा आणि उधमपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा आज, 13 मे 2025 रोजी बंद राहतील.
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "शनिवारी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये तात्काळ युद्धविराम घडवून आणण्यास मदत केली. मला वाटते की, हा कायमस्वरूपी युद्धविराम असेल. भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व ठाम होते. मी म्हणालो होतो की, जर तुम्ही युद्ध थांबवले नाही तर आम्ही व्यापार करणार नाही." दरम्यान, भारत सरकारनं ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: जम्मू, सांबा, अखनूर आणि कठुआ येथे ड्रोन दिसल्याच्या सुरुवातीच्या वृत्तानंतर, भारतीय लष्करानं पुष्टी केली आहे की, ड्रोन दिसले नाहीत. युद्धबंदीची परिस्थिती कायम आहे: सूत्रांची माहिती
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: सध्या शत्रूचं कोणतंही ड्रोन आढळल्याची माहिती नाही. परिस्थिती शांत आणि पूर्ण नियंत्रणात आहे: भारतीय लष्कर
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: नागपूर: ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "आज पंतप्रधान मोदींनी 3 नवीन नियमांचा उल्लेख केला आहे. पहिले म्हणजे, त्यांनी सांगितले की, यानंतर देशात कोणतीही दहशतवादी घटना घडली तर ते भारताविरुद्ध युद्ध म्हणून पाहिली जाईल आणि भारत त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देऊन योग्य उत्तर देईल. दुसरे म्हणजे, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, आम्ही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही. तिसरे म्हणजे, आतापर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांपासून हात धुवून घेत असे, डोळे बंद करून म्हणत असे की, हे गैर-राज्य घटकांनी केले आहे, परंतु आता भारत दहशतवादाच्या सूत्रधारांमध्ये फरक करणार नाही आणि भारत त्यांना त्याच नजरेनं पाहील आणि त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल..."
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: सियाट या राष्ट्रीय व्यापारी संघटनेनं देखील पाकिस्तानला समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अझरबायजान या राष्ट्रांशी कोणताही व्यापार न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 16 मे रोजी तातडीची बैठक बोलावण्यात आली असून सियाटच्या राष्टीय कार्यकारिणीच्या त्यासंदर्भातला ठराव पारित केला जाणार असल्याचं सियाटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया यांनी सांगितलं आहे.
तुर्कीला भारतातून डाळी , तांदूळ, गहू , साखर यासह अनेक कृषी साहित्य निर्यात केलं जातात. तो व्यापार आता पूर्णतः बंद केला जाणार आहे.
सियाट स्वदेशीच्या नाऱ्यासह भारत सरकार आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे असल्याचं बीसी भरतीया यांनी सांगितलं आहे.
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: भारतानं अमेरिकेचा दावा फेटाळून लावला. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी 9 मे रोजी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी 8 आणि 10 मे रोजी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी आणि 10 मे रोजी एनएसए डोभाल यांच्याशी चर्चा केली. या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ नव्हता
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंनी युद्धबंदी, लष्करी कारवाईशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली; सैन्याची संख्या कमी करण्याच्या उपाययोजनांवर विचार केला जाईल.
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: सांबा सेक्टरमध्ये दिसलेले ड्रोन्स खूपच कमी आहेत. त्यांच्यावर लष्कराकडून योग्य ती कारवाई केली जात आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही, सूत्रांची माहिती
Operation Sindoor LIVE: पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर पाकिस्तानचे काही ड्रोन्स जम्मू-काश्मीरमधील सांबा येथे घिरट्या घालताना दिसले. त्यावेळी सांबामध्ये काही काळासाठी ब्लॅकआऊट करण्यात आला होता. त्यानंतर मात्र पुन्हा कोणतीही हालचाल दिसलेली नाही : सूत्र
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर, उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी 9 मे रोजी पंतप्रधानांशी संवाद साधला. सचिव रुबियो यांनी 8 मे आणि 10 मे रोजी परराष्ट्र सचिवांशी आणि एनएसएशी चर्चा केली. यापैकी कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ नव्हता: सूत्र
India Pakistan Ceasefire LIVE: जम्मू आणि काश्मीर: सांबा येथे ब्लॅकआउट दरम्यान भारताच्या हवाई संरक्षण दलानं पाकिस्तानी ड्रोन रोखले, तेव्हा लाल रेषा दिसल्या आणि स्फोटांचे आवाजही ऐकू आले.
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचं श्रेय घेण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला. त्यांनी दावा केला की, दोन्ही देशांकडे न्यूक्लिअर पॉवर आहे. माझ्या प्रशासनानं दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणण्यास मदत केली. दरम्यान, सूत्रांनी सांगितलं की, अणुयुद्ध रोखण्याबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जे म्हटलंय, त्याच्या उलट, आपण असं म्हणू शकतो की, अण्वस्त्र वापरणं हे भारताचे कधीही उद्दिष्ट नव्हतं. यावेळी आमचं लष्करी उद्दिष्ट फक्त 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्याचं होतं. तसेच, वरिष्ठ सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, युद्धबंदीमध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती. जर तुम्ही थांबलात तर आम्ही थांबू, या पाक डीजीएमओच्या विनंतीला भारतानं सहमती दर्शवली होती.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- भारत
- India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: कश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा