India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास विभागाची जवळपास 20 स्लीपर ठिकाणी छापेमारी
India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: शनिवारी (10 मे 2025) भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली, पण काही तासांतच पाकिस्ताननं ती मोडली.
पार्श्वभूमी
India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी (10 मे 2025) रोजी रात्री अचानक एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री...More
India Pakistan Ceasefire LIVE: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी
9 मे
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं भारत-पाक तणावात आमचा काय संबंध? असं वक्तव्य
काही तासांतच जेडी व्हान्स यांनी भूमिका बदलत संघर्षात लक्ष
व्हान्स,परराष्ट्रमंत्री रुबिया मार्को आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी विलेस यांच्या बैठका
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचे संघर्षासंबंधी धोकादायक इनपुट
व्हान्स यांच्याकडून ट्रम्प यांना शस्त्रसंधीच्या प्लॅनची माहिती
ट्रम्पसोबतच्या चर्चेनंतर व्हान्स यांचा भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन
10 मे
पंतप्रधान शरीफ यांनी अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड ऑथरिटीची बैठक
दोन्ही देशांत अण्वस्त्रयुद्ध सुरु होऊ शकतं अशी व्हान्स आणि रुबिओंना भीती
पाकनं 400 ड्रोन्सचा हल्ला आणि भारताचे प्रत्युत्तर यामुळं व्हान्स,रुबिओ चिंतीत
रावळपिंडीतल्या नूर खान या एअर बेसवर भारताचा हल्ला, जवळच पाकचा अण्वस्त्रसाठा
पाकिस्तानकडे 170 हून अधिक अण्वस्त्रांचा साठा
भारताच्या पुढच्या हल्ल्यानं अण्वस्त्रांचं रेडिएशन पाकमध्ये पसरण्याची भीती
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीरला फोन
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना रुबियो मार्कोंचा फोन
सायं. 5.33 वा. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक्स पोस्ट करत शस्त्रसंधीची घोषणा
Operation Sindoor LIVE Updates: जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास विभागानं जवळपास 20 स्लीपर ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये अनेक स्लीपर सेल उद्ध्वस्त करण्यात आले. तांत्रिक गुुप्तचर माहितीच्या आधारी दक्षिण काश्मीरच्या 4 जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. पडकलेल्या स्लीपर सेल सदस्यांकडे आक्षेपार्ह साहित्य देखील सापडलं. अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, तिथल्या पोलिसांनी कठोर कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
Operation Sindoor LIVE Updates: जैसलमेरमध्ये काल पाकिस्तानातून पडलेल्या क्षेपणास्त्राचा भाग निकामी करण्याचं ऑपरेशन लष्कराकडून राबवण्यात येतंय. त्यामुळे हा परिसर रिकामा करण्यात आलाय. जैसलमेरमध्ये काल एक संशयास्पद क्षेपणास्त्र मिळालं होतं. ते निकामी करण्याचं काम सध्या सुरू आहे. अशा कुठल्याही संशयास्पद वस्तूंच्या जवळ जाऊ नये, असं आवाहन लष्काकडून करण्यात आलंय.
India Pakistan Attack LIVE Updates: पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर भारतीय वायूदलाची (IAF) महत्त्वाची माहिती दिली आहे. लष्करानं म्हटलंय की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. आयएएफनं म्हटलंय की, आम्ही या ऑपरेशनचं उद्दिष्ट साध्य केलंय आणि त्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल.
India Pakistan ceasefire: पाकिस्तानने लष्करी तळांवर मारा करण्यासाठी हवेत सोडलेले ड्रोन्स, हवेत डागलेली क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानांचा हल्ला परतावून लावत तितक्याच जोराने प्रतिहल्ला करुन भारताने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले होते. तब्बल चार दिवस भारत आणि पाकिस्तानी सैन्याकडून (Pakistan Army) एकमेकांवर हवाई हल्ले सुरु होते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या (America) मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे 'आम्ही युद्ध जिंकल्याच्या' फुशारक्या मारत असले तरी प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्याच घडामोडी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानला भारत आता काहीतरी भयंकर करेल, अशी भीती वाटायला लागली होती. त्यामुळे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. त्यानंतर अमेरिकेने भारत (Indian Army) आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करुन चर्चेला सुरुवात केली. अखेर शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानी सैन्याच्या महासंचालकांनी हॉटलाईनवरुन एकमेकांशी चर्चा करुन शस्त्रसंधीचा निर्णय घेतला.
Operation Sindoor LIVE Updates: युद्धबंदीबद्दल पाकिस्ताननं पुन्हा एकदा अमेरिकेचे आभार मानले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, युद्धबंदी लागू करण्यात मित्र देशांसह अमेरिकेनं बजावलेल्या भूमिकेचं ते कौतुक करतात, तणाव कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरतेच्या दिशेनं हे एक पाऊल आहे.
Operation Sindoor LIVE Updates: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, रावळपिंडीपर्यंत भारतीय सैन्याची उपस्थिती दिसून येत होती. लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारले. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही दाखवून दिले की भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करत आहे. भारतीय लष्कराने फक्त पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना लक्ष्य केले, परंतु पाकिस्तानी लष्कराने सामान्य नागरिकांना लक्ष्य केले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याने मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चला लक्ष्य केलं.
India Pakistan Tension LIVE: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकलेत. त्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तान आता नव्या कुरापती करत असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात झालीये. पाकिस्तानच्या हॅकर्सकडून व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे मालवेअर पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. या बनावट लिंक्स आणि व्हायरस बँकिंग तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहण्याचं आवाहन सुरक्षा यंत्रणेनं केलंय.
Indian Air Force On IND PAK War: भारतीय हवाई दलाने ट्वीट केलंय की, "...कार्यवाही अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. भारतीय वायूदल सर्वांना अटकळ आणि असत्यापित माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करते."
Shiv Sena (Thackeray Group) On India Pakistan War: ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारानं भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारला आहे. सोबतच पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असताना राजकीय नेतृत्त्वाने कच खाल्ली अशी टीकाही त्यांनी केली.
Donald Trump On India Pakistan War: हजारो वर्षांच्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर केलं. अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान आहे. संघर्षात लाखो जीव गेले असते, खूप नुकसान झालं असतं, असं ट्रम्प म्हणाले. तसंच भारत-पाकनं शस्त्रसंधी केल्याने दोन्ही पंतप्रधानांची प्रशंसा केली. तुमचे धाडसी निर्णय,तुमच्या परंपरेला साजेसे असल्याचं ट्रम्प म्हणाले. तसंच दोन्ही देशांसोबत आता खूप व्यापार वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Kapil Sibal On Ind Pak Tension: संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. विशेष सर्वपक्षीय बैठक बोलवा. मी राजकीय पक्षांना सल्ला तर देऊ शकत नाही. पण म्हणतोय की, जोपर्यंत सरकार हे आश्वासन देत नाही की, पीएम मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहातील , तोपर्यंत विरोधी पक्षांनी बैठकीला जाऊ नये. कारण ते पंतप्रधान आहेत. एवढा मोठा अत्याचार झालाय. आपल्या निष्पाप लोकांना मारण्यात आलंय. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाही बैठकीत बसले नाहीत आणि आताही बसणार नसतील. तर आम्हाला वाटतंय की, त्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असं राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
India Pakistan Tension LIVE: अमृतसरमधील परिस्थिती सामान्य असल्याचं अमृतसर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. लोक त्यांची दैनंदिन काम करत आहेत. रविवारी कार्यालय उघडलेली नाहीत, परंतु बाजारपेठा उघड्या आहेत आणि जनजीवन सामान्य आहे.
India Pakistan Ceasefire News LIVE: केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, देशाच्या सैन्याने आणि पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. काही लोक असे म्हणत राहतील, पण पंतप्रधान देशाची सेवा करत राहतील.
India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली. जयराम रमेश म्हणाले की, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि प्रथम अमेरिकेने आणि नंतर भारत-पाकिस्तान सरकारांनी जाहीर केलेल्या युद्धबंदीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
India Pakistan Ceasefire News LIVE: भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर, एनएसए अजित डोभाल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस अनिल चौहान हे देखील पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले आहेत.
India Pakistan Ceasefire News LIVE: पाकिस्तानसोबत युद्धबंदी करार झाल्यानंतर, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख सीडीएस अनिल चौहान आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
Abhay Patwardhan On Pakistan Ceasefire Violations: जेव्हापर्यंत शस्त्रसंधीवर अधिकृत हस्ताक्षर होणार नाही तेव्हा पर्यंत पाकिस्थानच्या कुरापती सुरूच राहणार आहे. कारण पाकिस्थानी सेना लिहीत आदेशाशिवाय तिथल्या राजकारण्यांना जुमानत नाही. त्यामुळे 12 मे ला शस्त्रसंधीवर हस्ताक्षर होत पर्यंत पाकिस्थाकडूनची कुरघोडी सुरुच राहील.
मात्र इतिहास बघता पाकिस्थान हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही . बलुचिस्थान आर्मीने पाकिस्थानच्या मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवले आहे त्यामुळे दोन्ही फ्रन्टवर लढण्यापेक्षा भारतासोबत शस्त्रसंधी करून एका भागात शांतता राहावी यासाठी पाकीस्थान ने माघार घेतली असावी असे दिसते.
Operation Sindoor LIVE Updates: अमृतसर डीसीनं सकाळी 5.24 वाजता एक निवेदन जारी केलं, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की, "आम्ही तुमच्या सोयीसाठी वीजपुरवठा पूर्ववत केला आहे, परंतु आम्ही अजूनही रेड अलर्टवर आहोत. आता सायरन वाजेल, जो या रेड अलर्टचे संकेत देईल. कृपया तुमच्या घराबाहेर पडू नका; घरातच राहा आणि खिडक्यांपासून दूर राहा. आम्हाला हिरवा सिग्नल मिळाल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. कृपया पालन करा आणि कृपया घाबरू नका."
Harshwardhan Sapkal On Terrors Attack: महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कराडच्या प्रीतिसंगमावर आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा पक्ष असून काँग्रेसला ज्वाजल्य इतिहास आहे. काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिलं. हा इतिहास काही लोक विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्लाच होता, असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. कराडच्या प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी ते बोलत होते.
Pakistan Ceasefire Violations LIVE: चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडे दिसत आहेत. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
Operation Sindoor LIVE Updates: जम्मू आणि काश्मीर पोलिसांची एसआयए (राज्य तपास संस्था) दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात दक्षिण काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकत आहे. शोपियान, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात छापे टाकले जात आहेत.
Pakistan Ceasefire Violations LIVE: जम्मू आणि काश्मीरमधील पूंछमधील परिस्थिती सामान्य दिसतेय. रात्रभर कोणतंही ड्रोन दिसल्याचं, गोळीबार झाल्याचं वृत्त नाही.
Operation Sindoor LIVE Updates: आता नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू नाही. लष्करी अधिकाऱ्यानं याबाबत पुष्टी केली आहे. यासोबतच त्यांनी असंही म्हटलंय की, श्रीनगरमध्ये कोणताही स्फोट झालेला नाही.
Operation Sindoor LIVE Updates: शाहबाज शरीफ यांनी युद्धबंदीबाबत एक ट्वीट केलं होतं, पण त्यांनी पोस्ट करेपर्यंत युद्धबंदीचा भंग झाला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, प्रदेशातील शांततेसाठी त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि सक्रिय भूमिकेबद्दल आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेच्या हितासाठी आम्ही स्वीकारलेल्या या निकालाला सुलभता प्रदान केल्याबद्दल पाकिस्तान अमेरिकेचे कौतुक करतो. दक्षिण आशियातील शांततेसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल आम्ही उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचंही आभार मानतो. पाकिस्तानचा असा विश्वास आहे की, ही या प्रदेशाला त्रास देणाऱ्या आणि शांतता, समृद्धी आणि स्थिरतेच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या समस्या सोडवण्याच्या दिशेनं एक नवी सुरुवात आहे.
Operation Sindoor LIVE Updates: भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे, याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आज पासून भाविकांना हार, नारळ आणि प्रसाद अर्पण करण्यास मनाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
India Pakistan Ceasefire News LIVE: आंतरराष्ट्रीय सीमेवरील जम्मू, आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला बीएसएफ प्रत्युत्तर देत आहे. नियंत्रण रेषेच्या अखनूर सेक्टरमध्येही गोळीबाराच्या घटना घडल्या.
India Pakistan Attack LIVE: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काश्मीरमधील श्रीनगरमध्ये अनेक स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. लाल चौक, बीबी कॅन्ट परिसर आणि सफापोरा येथे स्फोट झाले आहेत.
Operation Sindoor LIVE Updates: जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांना कडक प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला परवानगी देण्यात आल्याचे भारतीय सरकारी सूत्रांनी सांगितले.
Operation Sindoor LIVE Updates: जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांना कडक प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला परवानगी देण्यात आल्याचे भारतीय सरकारी सूत्रांनी सांगितले.
Operation Sindoor LIVE Updates: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, युद्धबंदीचं काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले...
Operation Sindoor LIVE Updates: उधमपूरमध्ये ब्लॅकआउट दरम्यान, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी ड्रोनला रोखले, लाल पट्टे दिसले आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.
India Pakistan War ceasefire violation LIVE Updates: अवघ्या 3 तासांनी पाकिस्ताननं युद्धबंदीचा भंग केला. उधमपूर, अखनूर, नौशेरा, पुंछ, राजौरी, मेंढार, जम्मू, सुंदरबनी, आरएस पुरा, अरनिया आणि कठुआ या भागात जोरदार गोळीबार केला. भारतीय सेनेकडूनही पाकिस्तानला चोख प्रतुत्तर देण्यात आलं.
India Pakistan Ceasefire News LIVE: राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउटची वेळ जाहीर करण्यात आली आहे. रात्री 11 वाजल्याऐवजी हा ब्लॅकआउट तात्काळ लागू होईल. आता ते पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजेपर्यंत असेल. युद्धबंदीच्या घोषणेनंतर वेळ बदलण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार, सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आज रात्री 8.30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे ब्लॅकआउट राहील, असं निर्देशांमध्ये म्हटलं होतं. म्हणून, सर्वसामान्यांना आवाहन करण्यात येतंय की, रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नका.
Operation Sindoor LIVE Updates: शनिवारी संध्याकाळी भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही तासांतच पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवला. त्यांनी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्यानं योग्य उत्तर दिलं. जम्मूच्या अनेक भागांत पाकिस्ताननं गोळीबार केला.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- भारत
- India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास विभागाची जवळपास 20 स्लीपर ठिकाणी छापेमारी