फिरोजपूर (पंजाब) : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सोहळ्यातच दरम्यान भारत आणि पाकिस्तानचे जवान भिडले. 9 जून रोजी ही घटना घडली होती. मात्र या घटनेचा व्हिडीओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.


 

 

या ठिकाणी नेहमीप्रमाणे बीटिंग रिट्रीट सोहळा सुरु होता. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तानच्या जवानाची टक्कर झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाणा करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांना वेगळं करण्यासाठी इतर जवानांना मध्ये पडावं लागलं. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

 

 

बीटिंग रिट्रीट सेरेमनीदरम्यान दोन्ही देशांचे जवान एकमेकांच्या देहबोलीतून राग व्यक्त करतात. पण कधीही थेट मारहाणीची वेळ आली नव्हती. मारहाण झाल्याने काहीवेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. वाद वाढल्याचं दिसताच दोन्ही देशांची अधिकारी धावत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना वेगळं केलं.

 

 

दोन्ही जवानांनी हातात आपापल्या देशांचे झेंडे घेतले होते. याचवेळी त्यांची टक्कर झाली.

 

पाहा व्हिडीओ



(या व्हिडीओची सत्यता एबीपी माझाने पडताळलेली नाही)