रघुराम राजनवरून अमर्त्य सेन यांची मोदी सरकारवर टीका
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 11:24 AM (IST)
नवी दिल्ली : रघुराम राजन यांच्या दुसऱ्या कार्यकाल स्विकारण्याला नकार देण्याच्या प्रकरणावरून सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यातच नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी देखील प्रतिक्रीया देताना देश एका चांगल्या अर्थतज्ज्ञाला हरवतो आहे, असे म्हणत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ४ सप्टेंबर २०१६ रोजी रघुराम राजन गव्हर्नरपदाची सुत्रे परत करून त्यापदाचा त्याग करत आहेत. जवळपास तीन वर्ष हे पद सांभाळणाऱ्या राजन यांनी दुसरी टर्म स्वीकारणार दिल्याने अर्थिक जगतात मोठा गोंधळ उडालेला आहे. रघुराम राजन यांचा हा निर्णय अतिशय निराशाजनक आहे. राजन यांच्या निर्णयावरून या सरकारला त्यांची कदर नसल्याची टीका यूपीए सरकारमधील अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.