नवी दिल्लीः भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवण्याचा मान महिलांना मिळाला आहे. भावना कांथ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यांनी पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवून इतिहासात आपलं नाव कोरलं आहे.

 

 

लष्करामध्ये महिलांना प्रवेश 90 च्या दशकामध्येच देण्यात आला मात्र, महिलांना मर्यादित कालावधीसाठी सेवेत घेतलं जात असे. तसंच महिलांचा लष्करातील समावेश केवळ प्रशासकिय पातळीवरील असल्यामुळे महिलांना आतापर्यंत लष्कराचं विमान उडवण्याची संधी मिळाली नव्हती.

 

 

सेनेच्या तिन्ही दलांमध्ये साल 2011 पर्यंत महिलांना केवळ प्रशासकीय, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा सेवांसाठीच संधी होती. मात्र 2014 सालानंतर पंतप्रधाव नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे महिलांना लष्करामध्ये लढाऊ सैनिकाच्या स्वरुपात स्थान देण्यात आलं.

 

 

असा झाला महिलांचा लष्करात समावेश

 

लष्काराच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना प्रशासन, अभियांत्रिकी, एटीसी, सिग्नल्स या क्षेत्रात केवळ पाच वर्षांची सेवा देण्याची संधी होती. तर पुरुष सैनिक 14 वर्षांची सेवा करु शकत होते. महिलांना लढण्यासाठी सेवेत घेण्यासाठी अनेक चर्चा झाल्या. यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वात उच्च समिती नेमण्यात आली. पण या समितीने 2006 आणि 2011 साली महिलांना युद्धभूमित प्रवेश देण्यास नकार दिला होता.

 

 

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांच्या लष्करातील समावेशाबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आणि 15 ऑगस्टच्या परेडपासून या चर्चेने जास्त जोर धरला.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या माध्यमातून महिलांना लष्काराच्या तिन्ही सेवेत सन्मानपूर्वक सहभागी करण्याचं समर्थन दिलं होतं. त्यानंतर महिलांचा लष्करी सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला.

 


संबंधित बातम्याः


 

त्या तिघींची गगन भरारी


 

हवाई दलाचं फायटर प्लेन उडवण्यास महिला पायलट सज्ज