नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. खेळाडूंनी जी मेहनत घेतली आहे, त्याच्या जोरावरच त्यांना इथवर मजल मारता आली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे.
जय आणि पराजय हा तर जीवनाचा एक भाग असतो असा संदेश ट्विटरवरुन देत नरेंद्र मोदींनी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या-ज्या खेळाडूंच्या स्पर्धा शिल्लक आहेत, त्यांनी कोणतंही दडपण न घेता खेळावं असं आवाहनही मोदींनी यावेळी केलं.
https://twitter.com/narendramodi/status/764481035715436544
https://twitter.com/narendramodi/status/764481227583791108
https://twitter.com/narendramodi/status/764481425957613568
सहनशक्ती, निर्धार आणि समर्पण या तीन गोष्टींच्या जोरावर भारतीय खेळाडूंनी रिओ ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली याचा आम्हाला अभिमान वाटतो, असंही मोदींनी म्हटलं. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पंतप्रधानांना स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून भारतीय खेळाडूंचं कौतुक करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाची वाट का पाहायची आताच मी माझे विचार मांडतो असं सांगत भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं.
https://twitter.com/narendramodi/status/764480921106022404