नवी दिल्लीः ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू प्रवाशांच्या मदतीला धावून आल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र सुरेश प्रभू आता प्रत्यक्षात प्रवाशांच्या भेटीला येत आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या #MyTrainStory या अभियानातून प्रवासी सुरेश प्रभूंना भेटू शकणार आहेत.


 

#MyTrainStory अभियानाअंतर्गत प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे अविस्मरणीय अनुभव शेअर करायचे आहेत. जे लोक ट्विटरवर सक्रिय नसतील त्यांना mytrainstory@gmail.com वर आपला अनुभव शेअर करता येणार आहे. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

 

काय आहेत नियम?

 

रेल्वे प्रवासी आपले प्रवासातील अनुभव फोटो, टेक्स्ट, ऑडियो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अभियानात भाग घेऊ शकतात. हे अभियान वर्षभरासाठी चालणार आहे. निवडक अनुभवांना रेल्वे मंत्रालयाद्वारे ई-प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. प्रत्येक तीन महिन्यात 3 सर्वोत्कृष्ट अनुभव शेअर करणाऱ्या प्रवाशांना सुरेश प्रभूंना भेटण्याची संधी मिळणार आहे.