SCO Meet: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दोन दिवस शांघाय परिषदेसाठी भारताच्या दौऱ्यावर होते. बिलावल भुट्टो हे गोव्यामधील शांघाय परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. परंतु, पाकिस्तानच्या सवयीप्रमाणे ते यावेळी देखील भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना चिडवायला विसरले नाहीत. बिलावल भुट्टो यांनी एका मुलाखतीत, कलम 370 चा उल्लेख करत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना न भेटण्याचं कारण सांगितलं होतं. तर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बिलावल भुट्टो यांना सडेतोड उत्तर देत झोपेतून जागे होण्याचा सल्ला दिला. 


गोव्यातील शांघाय परिषदेसाठी गेलेल्या बिलावल भुट्टो यांनी इंडिया टुडेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक न झाल्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध ठेवण्याचा संबंधच येत नाही, आजही पाकिस्तानच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत भारत 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केलेल्या कारवाईचा आढावा घेत नाही, तोपर्यंत पाकिस्तान भारताशी द्विपक्षीय संबंध ठेवण्याचा विचार करू शकत नाही.'


कलम 370 इतिहासजमा : डॉ. एस. जयशंकर 


बिलावल भुट्टो यांनी कलम 370 रद्द करण्याची मागणी केली, तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत त्यांना झोपेतून जागे होण्याचा सल्ला दिला. शांघाय परिषदेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, 'वेक अप अँड स्मेल द कॉफी' म्हणजेच, झोपेतून जागे व्हा आणि कॉफीचा आस्वाद घ्या, असं म्हणत कलम 370 हे इतिहासजमा झाले असल्याचा उल्लेख डॉ. एस. जयशंकर यांनी केला आहे. तसेच, यापुढे ते म्हणाले की, "जे लोक याची चर्चा करत आहेत, त्यांनी झोपेतून जागे व्हावे."


याआधी बिलावल भुट्टो यांनीही काश्मीरमध्ये जी-20 आयोजित करण्यावर आक्षेप घेतला होता. यावर एस जयशंकर म्हणाले होते की, "माझा जी-20 शी काही संबंध नाही, काश्मीरशीही काही देणे घेणे नाही. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्येही G-20 च्या बैठका होत आहेत, यात काही वेगळे नाही."


बिलावल भुट्टो यांच्या दौऱ्यावर डॉ. एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या भारत दौऱ्यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, यावरून नको ते अर्थ काढायला नको, भुट्टो हे सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून येथे आले होते, याकडे याव्यतिरिक्त काहीही वेगळे म्हणून पाहू नका, कारण याचा अर्थ यापेक्षा वेगळा काहीच नाही." 









महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sudan Crisis: भारताचे 'ऑपरेशन कावेरी' पूर्ण; 3862 नागरिक सुखरुप मायदेशी परतले