काठमांडू : भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. हेच निमित्त साधत भारताने नेपाळला अनोखं गिफ्ट दिलं.


नेपाळमधील रुग्णालयं, धार्मिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांना एकूण 30 अॅम्ब्युलन्स आणि 6 बस गिफ्ट म्हणून दिल्या.

नेपाळमधील भारताचे राजदूत मंजीव सिंह पुरी यांनी काठमांडूस्थित भारतीय  दूतावास परिसरात आयोजित एका कार्यक्रमात भारताकडून खास गिफ्ट दिलं. अॅम्ब्युलन्स आणि बसच्या चाव्या या संस्थांच्या प्रतिनिधींकडे सोपवल्या.

नेपाळमधील काठमांडूमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ध्वजारोहणानंतर भारताच्या राष्ट्रपतींच्या संदेशाचं वाचन करण्यात आले.