बंगळुरु : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने पाकिस्तानात घुसून तीन सर्जिक स्ट्राईक केल्याचे सांगून सर्वांना मोठा धक्का दिला आहे. परंतु त्यानंतर सिंह म्हणाले की, मी तुम्हाला दोन स्ट्राईकबद्दल माहिती देईन, परंतु तिसऱ्या स्ट्राईकबाबत काहीही सांगणार नाही.


राजनाथ सिंह म्हणाले की, "भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक केले. मी तुम्हाला यापैकी दोन एअर स्ट्राईकविषयी माहिती देईन, तिसऱ्या एअर स्ट्राईकविषयी माहिती देणार नाही."

सिंह यांनी उपस्थितांना उरी सर्जिकल स्ट्राईकविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकची माहिती दिली. तिसऱ्या स्ट्राईकबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यामुळे तिसरा एअर स्ट्राईक कोणता, तो कुठे केला, त्यात किती दहशतवादी मारले, याची सर्वांना उत्कंठा लागली आहे.

राजनाथ म्हणाले की, भारत आता पूर्वीसारखा दुबळा राहिलेला नाही, भारत आता बलशाली झाला आहे. आमचे सरकार आल्यापासून गेल्या पाच वर्षात भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात तीनवेळा एअर स्ट्राईक केले आहेत.

व्हिडीओ पाहा