नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा काल भारताचा 67 वा दिवस होता. लसीकरण सुरू झाल्यापासून काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाच कोटी लोकांना पहिली लस देण्यात आली. यात 79 लाखापेक्षा अधिक लोकं आरोग्य कर्मचारी आहेत. तर त्यातील 50 लाखापेक्षा अधिक लोकांना दुसरी लस देण्यात आली आहे. त्यासोबत 83 लाख 33 हजार फ्रंटलाईन कामगारांनी पहिली लस घेतली, तर 30 लाख 60 हजार फ्रंटलाईन कामगारांनी दुसरी लसदेखील घेतली आहे.
आतापर्यंत साठ वर्षांवरील 2 करोड लोकांनी लस घेतली आहे. तर 45 वर्षांवरील दोन कोटी लोकांनी लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या 67 व्या दिवशी 15,80,568 लोकांना लस देण्यात आली. तर यातील लस देण्यात आलेले 2,05,871 लोकं आरोग्य कर्मचारी होते.
देशभरात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाला सुरूवात झाली होती. तर 2 जानेवारीपासून कामगारांना लस देण्यात आली होती. 1 जानेवारीपासून 60 वर्षांवरील लोकांना आणि 45 वर्षांवरील आरोग्याच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते.
आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार
केंद्र सरकारणे घोषित केले आहे की, 45 वर्षांवरील लोकांना 1 एप्रिल पासून कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे आता 45 वर्षांपासून ते 59 वर्षांपर्यंतच्या लोकांना लस घेण्यासाठी आरोग्याच्या समस्या असणाऱ्या कुठल्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण नोंदणी करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारी 1977 नंतर जन्माला आलेली लोकं यात नोंदणी करू शकतात.