नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आता या महामारीमुळे बाधित रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 90 हजार 535 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत 91 हजार 819 जण कोरोनामुक्त झाले आहे. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 48.19 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 93 हजार 322 आहे. देशातील मृतांचा आकडा 5394 एवढा आहे. मागील 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या 8392 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 230 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या कशी वाढत गेली?
1 मार्च : फक्त 3 कोरोनोबाधित होते
1 एप्रिल : 1 हजार 636
1 मे : 35 हजार 043
1 जून : 1 लाख 90 हजार 535
- म्हणजे 1 मे ते 1 जून या काळात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 55 हजार 492 ने वाढली.
- कोरोनाबाधितांचा आकडा 22 मे पासून 28 मे पर्यंत दररोज 6 हजारांपेक्षा जास्त वाढला
- 29 आणि 30 मे या दोन दिवशी 7 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली
- तर काल 31 मे आणि आज 1 जून हा आकडा 8 हजारांनी वाढला आहे.
- 17 मे रोजी 90 हजार कोरोनाबाधित होते म्हणजे साधारण गेल्या पंधरा दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 1 लाखांची वाढ झाली आहे.
भारतात कोरोना बळींचा आकडा कसा वाढत गेला?
1 मार्च : एकही बळी गेलेला नव्हता
1 एप्रिल : 38 बळी
1 मे : मृतांची संख्या पोहोचली 1 हजार 147 वर
1 जून : 5 हजार 394
- म्हणजे 1 मे ते 1 जून या काळात कोरोनाने 4 हजार 247 बळी घेतले.
- त्यातही शेवटचे 1 हजार बळी 5 दिवसात गेले आहेत
- 14 मे रोजी अडीच हजार मृत होते
- 22 मे रोजी साडे तीन हजार
- 28 मे रोजी साडे चार हजार
- तर आज एक जून साडे पाच हजार + बळी कोविडने घेतले आहेत.
(स्त्रोत - WHO आकडेवारी)
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित
महाराष्ट्रात काल 2 हजार 487 कोरोनाबाधितांची वाढ झाली, तर 1 हजार 248 रुग्ण बरे झाले. दिवसभरात सर्वाधिक 89 लोक मृत्यूमुखी पडले आहे. आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 हजार 655 झाला आहे. त्यातील 29 हजार 329 बरे झाले असून महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 43.35 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 36 हजार 031 आहे. तर मृतांचा आकडा 2286 आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आहे. मुंबईत 39 हजार 686 कोरोनाबाधित असून त्यातील 1279 जणांचा बळी गेला आहे.