नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं वाटत असताना आता रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ होताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात 36.083 नव्या रुग्णांची भर पडली असून 493 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 37,927 रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्या आधी शुक्रवारी देशात 38,667 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 478 जणांचा मृत्यू झाला होता. 

देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.34 टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.45 टक्के इतकं आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये 11 व्या क्रमांकावर आहे. देशात शनिवारी केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये 19,451 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं दिसून आलंय आणि 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील आजची कोरोना आकडेवारीकोरोना एकूण रुग्ण- तीन कोटी 21 लाख 92 हजार 576एकूण डिस्चार्ज- तीन कोटी 13 लाख 76 हजार 15एकूण सक्रिय रुग्णसंख्या - तीन लाख 85 हजार 336एकूण मृत्यू - चार लाख 31 हजार 225एकूण लसीकरण- 54 कोटी 38 लाख 46 हजार डोस

राज्यातील स्थितीराज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 5,787 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 86 हजार 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के आहे. 

राज्यात शनिवारी 134 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 07,59, 767 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,87, 863 (13.58 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,73,812 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 512व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 262 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदमुंबईत गेल्या 24 तासात 262 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 323 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,775 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,879 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1860 दिवसांवर गेला आहे. 

महत्वाच्या बातम्या :