India Coronavirus Updates : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे, अशातच आज आठ महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 12,428 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 15,951 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील कोरोनाची स्थिती
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 42 लाख 2 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 55 हजार 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 83 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या दोन लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 63 हजार 816 रुग्ण अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत.
देशातील कोरोनाची एकूण आकडेवारी :
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 42 लाख 2 हजार 202
एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 35 लाख 83 हजार 318
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : एक लाख 63 हजार 816
कोरोनामुळे एकूण मृत्यू : चार लाख 55 हजार 068
एकूण लसीकरण : 102 कोटी 94 लाख 1 हजार लसीचे डोस
महाराष्ट्रात आज हजारांहून कमी रुग्णांची नोंद
कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra)निर्बंध पुन्हा एकदा कडक लावण्यात होते. ज्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात राज्याला मोठे यश आले. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यातच आज महाराष्ट्रात हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, मृत्युंच्या संख्येतही घट पाहायला मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात केवळ 23 हजार 184 रुग्ण सक्रिय आहेत. ही राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक माहिती आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 889 नवे रुग्ण आढळून आले. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 1 हजार 586 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 66 लाख 3 हजार 850 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 64 लाख 37 हजार 25 जणांनी कोरोनावर मात केली. राज्यातील रिक्वव्हरी रेट 97.47 वर पोहचला आहे.