India Coronavirus Cases : देशात कोरोना (Corona) प्रादुर्भावात काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांतील कोरोनाच्या (Covid-19) आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर, देशात 8 हजार 586 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 96 हजार 506 वर पोहोचली आहे. तसेच, देशातील एकूण बाधितांचा आकडा 4 कोटी 43 लाख 57 हजार 546 वर पोहोचला आहे. 


आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण मृतांचा आकडा 5 लाख 27 हजार 416 वर पोहोचला आहे. असं असलं तरी दिलासादायक बाब म्हणजे, देशातील रिकव्हरी रेट वाढला आहे. देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. पण यापैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 33 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 



29 लाखांहून अधिक लोकांना गेल्या 24 तासांत कोरोना लसीचा डोस 


देशातील लसीकरणाच्या आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर देशात हा आकडा झपाट्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 29 लाख 25 हजार 342 जणांचे लसीकरण करण्यात आलं असून, लसीकरणाची एकूण संख्या 210 कोटी 31 लाख 65 हजार 703 वर पोहोचली आहे.


राज्यात सोमवारी 1183 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात काल (सोमवारी) 1183 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात एकूण 1098  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,25, 645 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत 


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 584 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,13,499 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,673 झाली आहे. सध्या मुंबईत 5,769 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 592 रुग्णांमध्ये 571 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 966 दिवसांवर गेला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :